शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात २४७ जणांनी थाटला ‘नोंदणीकृत’ संसार

By admin | Updated: July 1, 2014 01:05 IST

उस्मानाबाद : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुखद बाब! जीवनातील हा सुखद क्षण धुमधडाक्यात साजरा करावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा!

उस्मानाबाद : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुखद बाब! जीवनातील हा सुखद क्षण धुमधडाक्यात साजरा करावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा! परंतु, वाढती महागाई, हॉलचे भाडे आदीमुळे स्वप्नातील विवाहसोहळे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत़ अनाठायी खर्चाला फाटा देत युवा पिढी नोंदणीकृत विवाहाला पसंती देत आहे़ जिल्ह्यात पाच वर्षात २४१ जोडप्यांनी नोंदणीकृत विवाह करून आपले संसार थाटले आहेत. ना जातीची अडचण ना पैशाची उधळपट्टी. उलट कायदेशीर मान्यता हे नोंदणी विवाहाचे वैशिष्ट्य आहे. नोंदणी विवाह करण्याचा सर्वात मोठा आणि प्राथमिक फायदा म्हणजे नोंदणीमुळे पती-पत्नीच्या नात्यावर कायद्याची मोहोर बसते. कोणत्याही नवदाम्पत्यासाठी ही कायदेशीर बाब पूर्ण होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी दोन भिन्न जाती किंवा धर्मातील तरूण-तरूणी त्यांच्या घरातून विरोध झाल्यास नोंदणी विवाहाचा पर्याय निवडत. परंतु, दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे पारंपरिक पध्दतीने विवाह निश्चित करून नोंदणी पध्दतीने विवाह लावले जात आहेत. याशिवाय ज्यांना परदेशी जायचे आहे किंवा तेथे स्थायिक व्हायचे असेल तर पासपोर्टसाठी नोंदणी विवाहाचे प्रमाणपत्र प्रमुख ‘डॉक्युमेंट’ मानले जाते. म्हणून अनेक परिवारात विवाह नोंदणी पध्दतीने करून नंतर पारंपरिक पध्दतीने स्वागत समारंभ पार पडतानाही दिसतात. उस्मानाबाद येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयातील २००९ पासून झालेल्या विवाह नोंदणीची आकडेवारी पाहता २०१३ साल वगळता दरवर्षी ४० ते पन्नास विवाह नोंदणीकृत झाल्याचे दिसते. या कार्यालयात २००९ साली ४२ जोडप्यांनी नोंदणीकृत विवाह केले. २०१० व २०११ साली प्रत्येकी ४७ तर २०१२ मध्ये हा आकडा ४९ वर गेला होता. २०१३ मध्ये मात्र यात थोडीशी घट होऊन तो ३५ वर आला. तर चालू सन २०१४ मध्ये आतापर्यंत २१ जणांनी नोंदणीकृत विवाह केले आहेत. या विवाहासाठी खर्च अत्यल्प प्रमाणात येतो. ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांनी विवाह नोंदणी कार्यालयाकडे अर्ज करायचा असतो. मुलगा किंवा मुलगी ही उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. अर्ज केल्यानंतर नोटीस जारी केले जाते. यावर काही आक्षेप आले नाही तर नोटीस जारी केल्यापासून ३१ व्या दिवसापासून ९० दिवसांपर्यंत कधीही नोंदणी विवाहाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. नोंदणी केल्यानंतर विवाह न करणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे येथील विशेष नोंदणी कार्यालय अधिकारी बी. बी. जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)