२४०० एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कापणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:24 IST2018-06-29T00:23:24+5:302018-06-29T00:24:19+5:30
महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेच्या वतीने वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी ८ आणि ९ जून असे दोन दिवस पुकारलेल्या अघोषित संपादरम्यान गैरहजर राहणा-या जवळपास २४०० कर्मचाºयांचे वेतन कपातीचे आदेश महामंडळ प्रशासनाने गुरुवारी दिले आहेत.

२४०० एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कापणार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेच्या वतीने वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी ८ आणि ९ जून असे दोन दिवस पुकारलेल्या अघोषित संपादरम्यान गैरहजर राहणा-या जवळपास २४०० कर्मचाºयांचे वेतन कपातीचे आदेश महामंडळ प्रशासनाने गुरुवारी दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे देशांतर्गत डिझेलचे दर वर्षभरात ११ ते १२ रुपयांनी वाढले आहेत. याचा परिवहन महामंडळाच्या तिजोरीवर परिणाम झाला. त्यातच महामंडळाने कर्मचाºयांना नुकतीच वेतनवाढ जाहीर केली. मात्र, ही वेतनवाढ समाधानकारक नसल्याच्या कारणावरून महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटना आणि इंटक ८ जूनपासून बेमुदत संपावर गेली होती. याचा पहिल्या दिवशी परिणाम जाणवला नाही. मात्र, दुसºया दिवशी वाहतूक सेवा पूर्णत: ठप्प होती. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील आठही आगार मिळून जवळपास ७५० आणि दुसºया दिवशी १७५० कर्मचारी गैरहजर होते. या संपादरम्यान गैरहजर राहणाºया कर्मचाºयांचे वेतन कपात करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने गुरुवारी काढले आहेत. या पत्रानुसार ‘ना काम ना दाम’ या तत्त्वानुसार त्या दिवसाचे वेतन देण्यात येऊ नये, याव्यतिरिक्त प्रत्येक कामगाराच्या वेतनातून ८ दिवसांची वेतन कपात करण्यात यावी, म्हणजेच १ दिवस गैरहजर राहिल्यास ९ दिवस आणि दोन दिवस गैरहजर राहिल्यास दहा दिवसांचे वेतन कपात करण्यात यावे, संप कालावधीत १-२ दिवस गैरहजेरीपोटी करावयाच्या वेतन कपातीची रक्कम जुलै २०१८ च्या पगारातून, तर उर्वरित ८ दिवसांच्या वेतनाची कपात ही आॅगस्टपासून प्रत्येक महिन्यास एक दिवस करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.