शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

२२०० कार्यकर्ते बनणार स्वच्छता दूत-दानवे

By admin | Updated: December 21, 2014 00:06 IST

जालना : माजी पंतप्रधान तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त २५ डिसेंबर हा दिवस सुशासन दिन म्हणून पाळणार आहे.

जालना : माजी पंतप्रधान तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त २५ डिसेंबर हा दिवस सुशासन दिन म्हणून पाळणार आहे. पक्षाच्या वतीने जालना शहरात स्वच्छता महाअभियान राबविण्यात येणार असून या दिवशी २२०० कार्यकर्ते स्वच्छता दूत बनणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी येथील खेरूडकर मंगल कार्यालयात शनिवारी दुपारी आयोजित पक्षाच्या जिल्हा कार्यकार्यरिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते पाशा पटेल, आ. नारायण कुचे, माजी आ. अरविंद चव्हाण, जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव, किशोर अग्रवाल, बाजार समितीचे उपसभापती रामेश्वर भांदरगे, देवीदास देशमुख, शहराध्यक्ष विरेंद्र धोका, सिद्धीविनायक मुळे आदींची उपस्थिती होती.या अभियानासाठी लागणाऱ्या साहित्याचे तसेच कार्यकर्त्यांना आणण्याची जबाबदारी सोपवून देण्यात आली. यावेळी शेषराव कळंबे, सुधाकर खरात, पदमाकर जऱ्हाड, गोविंदराव पंडित, विजयनाना परिहार, कृष्णा जिगे, नगरसेवक सतीश जाधव, नगरसेविका अरुणा जाधव, वंदना कुलकर्णी, माजी नगरसेविका कमल तुल्ले, विजयाताई बोरा, सुनील दायमा, रवींद्र देशपांडे, राजेंद्र फुलभाटी, दत्ता पाटील, संजय तौर, किरण खरात, जि.प.चे माजी सदस्य वसंत जगताप, बद्रीनाथ पठाडे, बाबासाहेब कोलते आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी काँग्रेसच्या माजी नगरसेविका विजयाताई बोरा यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी त्यांचे स्वागत केले. ४केंद्रीय राज्यमंत्री दानवे यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयी यांचा वाढदिवस देशभरात सुशासन दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार या दिवसी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकत्यांनी जालना शहरात सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात एकत्र यावे. त्यानंतर कार्यकर्त्यांचे वेगवेगळे समूह करून प्रत्येक समुहास एक भाग स्वच्छता अभियानासाठी दिला जाईल. प्रत्येकाने तेथे स्वत: हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करावा, असेही दानवे यांनी सांगितले.