शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांवर २0 कोटींचा भार

By admin | Updated: December 6, 2014 00:19 IST

औरंगाबाद : सरकारने महावितरणला देण्यात येणारे महिन्याचे अनुदान बंद केले आहे. त्यामुळे शहरातील वीज ग्राहकांना येणारे वीज बिल आता २० टक्के वाढवून येणार आहे.

औरंगाबाद : सरकारने महावितरणला देण्यात येणारे महिन्याचे अनुदान बंद केले आहे. त्यामुळे शहरातील वीज ग्राहकांना येणारे वीज बिल आता २० टक्के वाढवून येणार आहे. शहरातील २ लाख ४५ हजार ६२६ वीज ग्राहकांवर २० कोटींचा वीज बिलाचा बोजा पडणार आहे. जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेली १३०७ गावे आहेत, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त पैसेवारी असणारी ४६ गावे आहेत. जिल्ह्यात दुष्काळाचा शेतकऱ्यांसह व्यवसाय आणि उद्योगांवर परिणाम झाला आहे. आघाडी सरकारने ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळावी म्हणून महावितरणला महिन्याला ७०६ कोटी रुपये देऊ केलेले अनुदान युती सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन दुष्काळात तेरावा महिना आल्यासारखा निर्णय सरकारने घेतल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील ५ लाख १७ हजार ग्राहकांवर २० टक्के वीज दरवाढीचा बोजा पडणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण मिळून सरासरी ९५० मेगावॅट वीज लागत आहे. त्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना ३५० दशलक्ष युनिट वीज सरासरी लागत आहे. शहरातील घरगुती, व्यापारी आणि उद्योग वीज ग्राहकांच्या माध्यमातून महिन्याला सरासरी शंभर कोटींचे वीज बिल ग्राहकांकडून वसूल केले जात होते. विजेचे अनुदान बंद करताना शासनाने कृषिपंपांना वगळले. जिल्ह्यातील २ लाख २ हजार ४३६ कृषिपंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.उद्योगांना मोठा शॉक!औरंगाबाद : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना वीज दरवाढीचा आर्थिक फटका बसू नये या उद्देशाने तत्कालीन काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारने सुरू केलेली वीज सबसिडी भाजपा- शिवसेना युती सरकारने बंद करण्याचा खळबळजनक निर्णय गुरुवारी घेतला. त्यामुळे वीज ग्राहकांवर तब्बल २० टक्के दरवाढीची कुऱ्हाड कोसळणार आहे. या निर्णयामुळे अगोदरच संकटात असलेल्या उद्योगांना चांगलाच शॉक बसणार आहे.सध्या सुमारे ९ रुपये प्रति युनिट दराने वीज उद्योगांना देण्यात येत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत हे दर खूप असल्याची ओरड मागील वर्षीपासून करण्यात येत आहे. सप्टेंबर २०१३ मध्येही उद्योगांसाठी वीज दरात २० टक्के वाढ करण्यात आली होती. आता परत २० टक्के दरवाढ उद्योगांना अजिबात परवडणारी नसल्याचे लघु उद्योजकांचे म्हणणे आहे.