बनावट दारू बनवण्यासाठी नेण्यात येणारे २ हजार लिटर स्पिरीट जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 19:17 IST2023-02-21T19:17:28+5:302023-02-21T19:17:38+5:30
एक ट्रक अवैधरीत्या स्पीरिट घेऊन जळगावकडून औरंगाबादकडे जात होता

बनावट दारू बनवण्यासाठी नेण्यात येणारे २ हजार लिटर स्पिरीट जप्त
फुलंब्री ( औरंगाबाद) : येथील पोलिसांनी बनावट दारू बनविण्यासाठीचे दोन हजार लिटर स्पिरीट घेऊन जाणारा ट्रक पकडला. हि कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि, एक ट्रक अवैधरीत्या स्पीरिट घेऊन जळगाव कडून औरंगाबादकडे जात असल्याची माहिती फुलंब्री पोलिसांना गोपनीय बातमीदार मार्फत मिळाली. त्यानुसार फुलंब्री पोलीसांनी रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान ग्रामीण रूग्णालयाजवळ सापळा रचला. त्यानंतर संशयित ट्रक ( क्रमांक एमएच ३१ सीबी ०७४८ ) पोलिसांनी अडवला.
चालक किरण मधुकर थोरकर ( २८ वर्ष रा. झोडगे ता. मालेगाव जि. नाशिक ) व त्याचा सहकारी प्रविण लोटक गंवादे ( रा. जाजवाडे ता. मालेगाव जि. नाशिक ) यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. त्यात २०० लिटर क्षमतेचे १० ड्रम स्पिरिटने आढळून आले. याचा वापर बनावट दारू बनविण्यासाठी होतो. पोलिसांनी एकूण २३ लाख २३ हजार रुपयांचा मुदेमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
हि कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक धुळे, पोलीस अंमलदार आरपी सोनुने, मुजीब सय्यद, अनिल शिंदे, संतोष डोंगरे, यांनी केली.