शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

१.८४ कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा फेटाळला

By admin | Updated: July 24, 2014 00:39 IST

औरंगाबाद : तेंदूपत्ता गोदामाला आग लागल्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीविरुद्ध दाखल १ कोटी ८४ लाख ८९ हजार रुपयांचा भरपाईचा दावा राज्य ग्राहक आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने खारीज केला.

औरंगाबाद : तेंदूपत्ता ठेवण्यात आलेल्या चारपैकी एका गोदामाला आग लागल्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीविरुद्ध दाखल केलेला १ कोटी ८४ लाख ८९ हजार रुपयांचा नुकसानभरपाईचा दावा राज्य ग्राहक आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने खारीज केला.अर्जदार डी. रामा किशन गंगाराम आणि अडेपू आनंद (दोघेही रा. आंध्र प्रदेश) यांनी महाराष्ट्र वनविभागाकडून राज्यातील तेंदूपत्ता जमा करण्याचा ठेका घेतला होता. हा तेंदूपत्ता त्यांनी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील चार गोदामांमध्ये ठेवला होता. युनायटेड इंडिया विमा कंपनीकडून प्रत्येक गोदामाचा विमा उतरवला होता. एका गोदामाला ८ नोव्हेंबर २०११ रोजी आग लागून त्यातील तेंदूपत्ता जळाला. त्यामुळे अर्जदारांनी विमा कंपनीकडे २९ लाख ६० हजार रुपये, ३७ लाख ६५ हजार रुपये आणि १ कोटी १७ लाख ६४ हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, म्हणून दावा दाखल केला. हा दावा विमा कंपनीने फेटाळला. घटना महाराष्ट्रातील असल्याने विमा कंपनीने राष्ट्रीय आयोगासमोर याबाबत हरकत घेतली तेव्हा हा दावा राज्य ग्राहक आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला. खंडपीठाचे न्यायिक सदस्य न्या. एस. एम. शेमबोले आणि सदस्य उमा एस.बोरा यांच्यासमोर या दाव्यावर सुनावणी झाली. विमा कंपनीतर्फे अ‍ॅड. सुधीर कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला की, चारपैकी एकाच गोदामाला आग लावण्यात आल्याचा अहवाल तज्ज्ञ सर्वेअरने दिलेला आहे. त्यामुळे हा दावा फे टाळण्यात यावा. तो न्यायालयाने मान्य केला.