शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार ग्राहकांनी भरले २.९१ कोटी

By admin | Updated: August 22, 2014 00:22 IST

नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडलात आॅनलाईन वीज बिल भरण्याच्या प्रणालीत वीज ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडलात आॅनलाईन वीज बिल भरण्याच्या प्रणालीत वीज ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. जुलै २०१४ या महिन्यात आॅनलाईनद्वारे १७९९६ ग्राहकांनी २ कोटी ९१ लाख ४ हजार १५० रुपयांचा भरणा केला. वीज बिल भरण्यात नांदेड जिल्हा आघाडीवर आॅनलाईन वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या यंत्रणेत प्रत्येक महिन्यास आॅनलाईन ग्राहकांची वाढ होत आहे. फेब्रुवारी २०१४ च्या तुलनेत जुलै २०१४ मध्ये अशा ग्राहकांची संख्या सुमारे ३ हजारांनी वाढली आहे.मागील सहा महिन्यांत आॅनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा आढावा घेतला असता दर महिन्याला अशा ग्राहकांत मोठी वाढ होत आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये नांदेड परिमंडलाचे १४ हजार ११० आॅनलाईन वीज बिल भरणारे ग्राहक होते. मार्च २०१४ मध्ये त्यांची संख्या १५ हजार २६० वर गेली. एप्रिल २०१४ मध्ये १५ हजार ६९ ग्राहकांनी तर मे २०१४ मध्ये १५ हजार ६५६, जून महिन्यात १७ हजार ९४६ ग्राहकांनी आॅनलाईन प्रणालीद्वारे वीज बिल भरले तर जुलै २०१४ मध्ये १७ हजार ९९६ ग्राहकांनी वीज बिल आॅनलाईन प्रणालीद्वारे भरले आहे.आॅनलाईन प्रणाली मार्फत वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या संकेत स्थळावर जावून ग्राहकांना आॅनलाईन वीज बिल भरता येते. ही वीज बिल भरण्यासाठी देशातील प्रमुख व राष्ट्रीयकृत बँकांचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, मास्ट्रो कार्ड यांच्यासह नेट बॅकींग सेवेचाही वापर करता येतो. या प्रणालीमार्फत वीज बिल भरल्यास ग्राहकांना रांगेत उभे न राहता वेळेची बचत करता येते. कमी वेळात आणि श्रमात वीज बिल भरण्याच्या या प्रक्रियेचा ग्राहकांनी विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. नांदेड परिमंडळात नांदेड, परभणी आणि हिंगोली या तिन्ही जिल्ह्याच्या ठिकाणी महावितरणने ग्राहकांना केव्हाही वीज बिल भरता यावे, यासाठी एटीपी मशीन उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सर्व आधुनिक प्रणालीचा वापर ग्राहकांनी करावा. त्यातून आपला वेळ, श्रम आणि पैशाची बचत करावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता आर. जी. शेख यांनी केले आहे. (प्रतिनिधी)