१७ वर्षांची अविरत परंपरा! प्रजासत्ताक दिनी कायद्याच्या विद्यार्थ्यांनी चार भाषांत दिला संविधानाचा मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 18:16 IST2026-01-27T18:15:24+5:302026-01-27T18:16:20+5:30

चार भाषांत प्रास्ताविक वाचन! १७ व्या संविधान संदेश रॅलीत विद्यार्थ्यांकडून घटनात्मक मूल्यांचा जागर

17 years of unbroken tradition of M P Law College's Sanvidhan Sandesh Rally! Law students recite the mantra of the Constitution to Chhatrapati Sambhajinagar on Republic Day | १७ वर्षांची अविरत परंपरा! प्रजासत्ताक दिनी कायद्याच्या विद्यार्थ्यांनी चार भाषांत दिला संविधानाचा मंत्र

१७ वर्षांची अविरत परंपरा! प्रजासत्ताक दिनी कायद्याच्या विद्यार्थ्यांनी चार भाषांत दिला संविधानाचा मंत्र

छत्रपती संभाजीनगर: भारतीय प्रजासत्ताकाचा ७७ वा वर्धापन दिन छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने शहरातील प्रतिष्ठित माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालयाच्या वतीने १७ व्या 'संविधान संदेश रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. समाजात संविधानिक मूल्ये, मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने २०१० पासून ही रॅली अविरतपणे काढली जात आहे.

या रॅलीचे उद्घाटन माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अपर्णा कोत्तापल्ले आणि आय.बी.पी. महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या यांच्या हस्ते संयुक्तपणे करण्यात आले. या नाविन्यपूर्ण रॅलीच्या आयोजनात समन्वयक प्रा. एस. एन. मोरे यांचा मोलाचा वाटा आहे. ही रॅली अदालत रोड, क्रांती चौक, पैठण गेट, औरंगपुरा आणि महात्मा फुले पुतळा या मार्गावरून मार्गस्थ झाली. या प्रवासात महापुरुषांच्या प्रेरणास्थळांना विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.

बहुभाषिक प्रस्तावना वाचनाने सांगता 
रॅलीची सांगता महाविद्यालयात संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने झाली. विशेष म्हणजे, संविधानाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी मराठी (गायत्री धंडारे), हिंदी (योगेश सोनवणे), इंग्रजी (साक्षी चौंडिये) आणि उर्दू (अदिबा नाज) अशा चार भाषांमध्ये प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

यशस्वी आयोजनासाठी परिश्रम
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अपर्णा कोत्तापल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक श्रीकिशन मोरे, डॉ. अभय जाधव, डॉ. शशिकांत शिरसाट, डॉ. प्रतिभा गिरबने आणि डॉ. सचिन देशमुख यांनी रॅलीचे नियोजन केले. विद्यार्थी प्रतिनिधी संकेत शिरसट, गौरव देशपांडे यांच्यासह तनया राज, प्रसाद ढोले, हर्ष इंगोले, प्रज्वलित बनसोडे, भक्ती सांगळे, दुर्गा संबलवार, राहुल जैस्वाल, रमेश गिरगुणे, ऋतुजा गव्हारे, प्रिया कवटवार आदि विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Web Title : गणतंत्र दिवस पर विधि छात्रों ने चार भाषाओं में संविधान का पाठ किया।

Web Summary : औरंगाबाद के माणिकचंद पहाड़े लॉ कॉलेज ने गणतंत्र दिवस पर 17वीं 'संविधान संदेश रैली' आयोजित की। छात्रों ने संवैधानिक मूल्यों और जागरूकता को बढ़ावा देने के लिए मराठी, हिंदी, अंग्रेजी और उर्दू में संविधान का पाठ किया।

Web Title : Law students celebrate Republic Day with multilingual constitution recital.

Web Summary : Aurangabad's Manikchand Pahade Law College held its 17th 'Constitution Message Rally' on Republic Day. Students recited the constitution in Marathi, Hindi, English, and Urdu to promote constitutional values and awareness.