शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावात तब्बल १६९ अर्ज दाखल

By admin | Updated: December 17, 2015 23:49 IST

सेनगाव : येथील नगर पंचायत निवडणुकरीता शेवटच्या दिवशी ६८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून आता रिंगणात एकूण १६९ उमेदवारी अर्ज आले आहेत.

सेनगाव : येथील नगर पंचायत निवडणुकरीता शेवटच्या दिवशी ६८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून आता रिंगणात एकूण १६९ उमेदवारी अर्ज आले आहेत. सेनगाव नगरपंचायत निवडणुकीच्या १७ प्रभागाकरीता उमेदवारी दाखल करण्याचा १७ डिसेंबर ही शेवटचा दिवस होता. गुरूवारपर्यंत ९१ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. आज ६८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. एकूण १६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बहुतांश उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केल्याने उमेदवारी अर्जाची संख्या जास्त झाली आहे. पक्षाचा उमेदवारीचा बी फॉर्म जोडण्याचा शेवटचा दिवस असल्याने विविध पक्षाचा उमेदवारांची मोठी लगबग पहावयास मिळाली. एका प्रभागात जवळपास पाच ते सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अवधी संपल्यानंतरच निवडणूक लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. सर्व पक्षांनी शुक्रवारी आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. नगर पंचायत निवडणूकीकरीता मातब्बर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. प्रभाग एकमध्ये जि.प. सदस्य ओमप्रकाश देशमुख, भाजपाचे अभिजित देशमुख, प्रभाग चारमध्ये अंजली आप्पासाहेब देशमुख, प्रभाग अकरामध्ये मनसे जिल्हा सचिव संदेश देशमुख, काँग्रेसचे सतीश खाडे, राष्ट्रवादीचे उमेश देशमुख तर प्रभाग सहामध्ये काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्या पत्नी तारामती देशमुख तर प्रभाग १४ मध्ये माजी उपसभापती कैलास देशमुख आदी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. (वार्ताहर)