शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाच्या फटक्याने विमानसेवा विस्कळीत; छत्रपती संभाजीनगरचे १५० पर्यटक दुबईत अडकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 16:09 IST

परदेशात गेलेल्या मराठवाड्याच्या पर्यटकांची धाकधूक वाढली; विमानसेवा ठप्प

छत्रपती संभाजीनगर : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम पर्यटन क्षेत्रावरही दिसू लागला असून, परदेशात पर्यटनासाठी गेलेल्या प्रवाशांच्या परतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. विमानसेवा विस्कळीत होणे आणि काही विमानतळांवरील उड्डाणे रद्द झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील सुमारे १५० पर्यटक दुबई येथे अडकले असल्याची माहिती ट्रॅव्हल असोसिएशनने दिली. याशिवाय विविध देशांतील विमानतळांवरही काही प्रवासी अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगरात पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांच्या परतीचाही प्रश्न निर्माण होत आहे. रोमानियातील २२ पर्यटकांचा परतीचा प्रवास दोहामार्गे नियोजित होता; मात्र दोहा विमानतळ बंद झाल्याने त्यांच्या परतीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. पर्यटन क्षेत्रातील संस्था आणि ट्रॅव्हल एजंट पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जागतिक घडामोडींमुळे अचानक बदललेल्या विमान वाहतुकीचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर जाणवत असून, प्रवासी आणि पर्यटन व्यावसायिक दोघांसाठीही ही परिस्थिती आव्हानात्मक ठरत आहे. अडकलेल्या प्रवाशांच्या सुरक्षित परतीसाठी ट्रॅव्हल एजन्सी, पर्यटन संस्था आणि संबंधित यंत्रणा समन्वय साधत आहेत.

पर्यटनासाठी गेलेले अडकलेमी स्वत: ‘युके’त आहे. ५ मार्चला परतीचे विमान आहे. पर्यटनासाठी गेलेले छत्रपती संभाजीनगरमधील जवळपास १५० जण दुबईत अडकलेले आहेत. याशिवाय ठिकठिकाणी, विमानतळांवरही काही जण अडकलेले असण्याची शक्यता आहे.- मंगेश कपोते, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद

व्यवस्था करतोयरोमानियाचे २२ पर्यटक शहरात आले आहेत. त्यांचे परतीचे विमान दोहामार्गे होते; परंतु आता दोहा विमानतळ बंद झाले. त्यामुळे पर्यटकांच्या परतीच्या प्रवासाचा प्रश्न आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू आहे.- जसवंत सिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)

माहिती संकलनाचे काम सुरूआखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला असून, पर्यटनासह विविध कारणास्तव दुबई, अबुधाबीत मराठवाड्यातील ९ जण अडकल्याची प्राथमिक माहिती विभागीय आयुक्तालयाने कळविली आहे. राज्य आपत्कालीन विभागाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आखाती देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क क्रमांक दिले आहेत, तसेच नागरिकांना जिल्हा प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. विभागातील शेकडो नागरिक अडकल्याची शक्यता असून, माहिती संकलन सुरू असल्याचे विभागीय प्रशासनाने कळविले. विभागीय आयुक्तालयाच्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ व्यक्ती, जालना जिल्ह्यातील ३ व्यक्ती आणि हिंगोली जिल्ह्यातील १, असे ७ जण दुबईत तर जालन्यातील २ व्यक्ती अबुधाबीत अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. खाजगी ट्रॅव्हल्स संस्थांकडून परदेशात गेलेल्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : War disrupts flights; 150 tourists from Chhatrapati Sambhajinagar stranded in Dubai!

Web Summary : War in Middle East disrupts flights, stranding 150 tourists from Chhatrapati Sambhajinagar in Dubai. Travel agencies seek alternatives for stranded passengers as global events impact travel.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरairplaneविमान