शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

१५ मदरशांना अनुदान मंजूर

By admin | Updated: August 3, 2014 01:13 IST

कळमनुरी : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील १५ मदरशांना ४८ लाख ८० हजारांचे अनुदान शासनाने मंजूर केले आहे.

कळमनुरी : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील १५ मदरशांना ४८ लाख ८० हजारांचे अनुदान शासनाने मंजूर केले आहे.मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत राज्यातील २७४ मदरसांना ९ कोटी २१ लाख ६१ हजार ८५९ रुपयांचा निधी शासनाने २०१४-१५ या वर्षासाठी मंजूर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेल्या अर्जांची छाननी करून पात्र मदरशांची यादी शिफारशी व आवश्यक निधीच्या मागणीसह शासनाकडे पाठविली होती. जिल्हाधिकारी मदरशाच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यामध्ये इ.सी.एस.द्वारे रक्कमा जमा करतील. मदरशांनी अनुदान प्राप्त होताच तीन महिन्याच्या आत प्रस्तावात नमूद केलेले कामे करणे आवश्यक आहे. नंतर उपयोगिता प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावे, या योजनेंतर्गत उद्भवणाऱ्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती तक्रार करण्यात आली आहे. नोंदणीकृत मदरशांना पायाभूत सुविधा आणि विशेष शिक्षकांच्या वेतनाकरिता सहाय्यक अनुदान या लेखाशिर्षखाली मंजूर करण्यात आलेले अनुदानातून भागविण्यात यावा, मदरशांना वितरित करण्यात आलेले अनुदान पायाभूत सुविधा, ग्रंथालय, शिक्षकांचे मानधन यावर खर्च करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दानिश वेलफेअर सोसायटी, हिंगोली, मदरसा ईकरा वसमत, खाजा गरीब नवाज कुरूंदा, दर्गाह ए-सुमाणी वसमत, दारुल उलूम सिरेहक रजाए मुस्तफा वसमत, जामिया रहेमानिया हिंगोली, राबीया बसरा वसमत, मदरसाए आयशा सिद्दीकी औंढा नागनाथ दारुल उलूम गौसिया अरबीया, कळमनुरी, मिव्हाजुल उलूम रहेमाननिया औंढा नागनाथ, युसूफ मदरसा हिंगोली, अलाउद्दीन मदरसा आंधारवाडी, मदरसा अलहुदा वसमत, मदरसा ए अजुमन आखाडा बाळापूर, उमर बिन खताब वसमत या १५ शाळांना निधी मंजूर करण्यात आला आहे. (वार्ताहर)