टँकर-जीपच्या भीषण अपघातात १४ जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 17:16 IST2019-05-29T17:13:49+5:302019-05-29T17:16:44+5:30
जोरदार धडकेने दोन्ही वाहने रस्त्यावरील पुलाखाली गेली.

टँकर-जीपच्या भीषण अपघातात १४ जण गंभीर जखमी
सिल्लोड (औरंगाबाद ) : सिल्लोड़- कन्नड़ रोडवरील दिगावजवळ एका पाण्याच्या टँकरने जीपला समोरासमोर जोरदार धड़क दिली. यात लग्न समारंभासाठी जाणारी १४ जण गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना आज ( दि. २९) दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली.
तालुक्यातील सिरसाळा तांडा येथील १७ जण एका जीपमध्ये कन्नड़ तालुक्यातील जैतखेड़ा तांडा येथे लग्न समारंभासाठी जात होते. कन्नड रोडवरील दिगावजवळ समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरने (एम एच 18 ए ए 931) त्यांच्या जीपला समोरून जोरदार धड़क दिली. जोरदार धडकेने दोन्ही वाहने रस्त्यावरील पुलाखाली गेली. यात जीपमधील १४ जण जखमी झाली. दिगावचे माजी सरपंच विठ्ठल सुसुंदरे, उप सरपंच राजु तुपे यांनी जखमींना सिल्लोड़ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारनंतर जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे.
जखमींची नावे :
साईंदास रायसिंग राठोड वय 26, स्वाती विट्ठल पवार वय 12, गेनूबाई हरजी राठोड वय 65, हीरालाल शामराव राठोड वय 30, नंदनी दासु वय 10, नंदनी विट्ठल राठोड वय 12, एकनाथ काशीनाथ राठोड वय 22, पायल विठुबाई पवार वय 12, रोहिदास धनु राठोड वय 80, दासुसेवा राठोड 60, बाबिताबाई एकनाथ राठोड वय 08, काजल सुंदरसिंग राठोड वय 14, संजय रामचंद्र राठोड वय 35, परवाताबाई आनंदा राठोड वय 45