शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: September 3, 2015 00:27 IST

जालना : येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील अपहार प्रकरणातील आरोपी जिल्हा व्यवस्थापक मधुकर बापूराव वैद्य व लिपीक अशोक एकनाथ खंदारे यांची

जालना : येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील अपहार प्रकरणातील आरोपी जिल्हा व्यवस्थापक मधुकर बापूराव वैद्य व लिपीक अशोक एकनाथ खंदारे यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.जालना येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात जिल्हा व्यवस्थापक मधुकर बापूराव वैद्य व लिपीक अशोक एकनाथ खंदारे यांनी संगनमत करून महामंडळाच्या ८ कोटी ५७ लाख ८८६ रूपयाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल म्हस्के यांच्या फिर्यादीवरून २३ एप्रिल रोजी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा तपास हाती आल्यानंतर सीआयडीने २४ आॅगस्ट रोजी व्यवस्थापक मधूकर वैद्य व लिपीक खंदारे यांना अटक केली होती. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता २९ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर २ सप्टेंबरपर्यंत वाढ देण्यात आली होती. बुधवारी मुदत संपल्याने सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दुपारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.यावेळी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आरोपींकडून काही महत्वाच्या फायली मिळाल्या नाहीत. त्यामुळे पाच दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. तसेच आरोपींच्या वकीलांनी दोन वेळेस पोलिस कोठडी घेतली. त्या दरम्यान आरोपींच्या घराची व नातेवाईकांच्या घराची झडती घेण्यात आली. मात्र काही हाती लागले नाही. तसेच हा याच पद्धतीचा अपहाराचा गुन्हा इतर जिल्ह्यातही घडलेला आहे. त्यामुळे हा गुन्हा वरिष्ठांच्या सांगण्यावरून झालेला असवा, असा युक्तिवाद करण्यात आला.