१२वी पास तरुणाने सुरू केले गर्भलिंग निदान रॅकेट; युट्यूबवर व्हिडीओ पाहून शिकला, अखेर सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 05:36 IST2026-03-22T05:36:30+5:302026-03-22T05:36:58+5:30

न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

12th pass youth started a sex determination racket learned by watching videos on YouTube finally caught | १२वी पास तरुणाने सुरू केले गर्भलिंग निदान रॅकेट; युट्यूबवर व्हिडीओ पाहून शिकला, अखेर सापडला

१२वी पास तरुणाने सुरू केले गर्भलिंग निदान रॅकेट; युट्यूबवर व्हिडीओ पाहून शिकला, अखेर सापडला

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : शहरात  गर्भलिंग निदान चाचणी करून गर्भपात करून देणारी नवी टोळी तयार झाली आहे. नारेगाव गर्भपाताच्या तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीमधून डॉ. सतीश सोनवणेच्या अटकेनंतर त्याचा चालक राहुल झोंड याने ऑनलाइन पोर्टेबल एक्सरे मशीन खरेदी करून हे धंदे सुरू केले होते.

झोंडचा साथीदार सोमनाथ बारासे याला शुक्रवारी अटक करण्यात आली.  नारेगाव मनपा रुग्णालयातील शिपाई शंकर आढाव यालाही अटक झाली.

असा उघड झाला प्रकार

७ मार्चला गर्भपाताचे रॅकेट चालविणारा डॉ. सोनवणे, जालन्यातील परिचारिका कमळ तीनगोटे, मयूर पार्क येथील महालॅब चालक अनिल जाधव (सपकाळ) यांनी  नारेगावात २६ वर्षीय विवाहितेचा घरातच गर्भलिंगनिदान करून गर्भपात केला. १३ मार्चला विवाहितेचा पती अरबाज फेरोज सय्यद, सासू आशिया फेरोज सय्यद, सासरा फेरोज मन्सूर सय्यद (सर्व, रा. बलूच गल्ली, नारेगाव) यांना अटक झाली. 

डमी पती-पत्नी पाठवून सापळा

पोलिसांना राहुलविषयी माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी डमी पती-पत्नीच्या माध्यमातून राहुलशी संपर्क साधून सापळा रचला. त्याला गर्भलिंग निदान करण्याबाबत विचारले. राहुलने २५ हजार रुपये सांगून पिसादेवी परिसरात बोलावले. ठरल्याप्रमाणे राहुल आणि त्याच्या साथीदाराने दाम्पत्याची भेट घेताच त्यांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून पोर्टेबल मशीन, टॅब जप्त करण्यात आले. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

 

Web Title : 12वीं पास युवक ने शुरू किया भ्रूण लिंग निर्धारण रैकेट; यूट्यूब से सीखा

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में 12वीं पास युवक ने यूट्यूब से भ्रूण लिंग निर्धारण सीखकर रैकेट चलाया। पुलिस ने युवक और उसके साथियों को गिरफ्तार किया, अवैध लिंग परीक्षण और गर्भपात के लिए इस्तेमाल किए जाने वाले पोर्टेबल एक्स-रे मशीन जब्त किए।

Web Title : 12th-Pass Youth Busted in Sex Determination Racket; Learned from YouTube

Web Summary : A sex determination racket, run by a 12th-pass youth who learned the procedure via YouTube, has been busted in Chhatrapati Sambhajinagar. Police arrested the youth and his accomplices, seizing portable X-ray machines and other equipment used for illegal prenatal sex determination and abortion.