शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वाळूची अवैध वाहतूक करणारे १२ ट्रक पकडले

By admin | Updated: September 14, 2014 00:21 IST

पैठण : अवैध वाळू वाहतूक करणारे १२ ट्रक पैठण पोलिसांनी शनिवारी जप्त करून ठाण्यात जमा केले आहेत.

पैठण : अवैध वाळू वाहतूक करणारे १२ ट्रक पैठण पोलिसांनी शनिवारी जप्त करून ठाण्यात जमा केले आहेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या संयुक्त झालेल्या बैठकीत २ ब्रास वाळू वाहतुकीस परवानगी देण्यात आली होती व वाळू वाहतूक करताना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले परवानापत्र ट्रकवर लावणे बंधनकारक करण्यात आले होते. कारवाई करण्यात आलेल्या ट्रकवर हे परवानापत्र लावण्यात आले होते. या पत्रानुसार ट्रक टाकळी अंबड वाळूपट्ट्यातून भरून देण्यात आलेले होते.पोलीस निरीक्षक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अंकुश पाटोळे, जमादार दिलीप औताडे, सिराज पठाण, संतोष चव्हाण, भागीनाथ धटिंग, कोटलवार आदींच्या पथकाने, पैठण-औरंगाबाद रोड, पैठण-शहागड रोड व सोलनापूर फाट्याजवळ कारवाई करीत क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणारे ट्रक जप्त केले. हे ट्रक पोलीस ठाण्यासमोर उभे करण्यात आले आहेत. एमएच-२० सीटी-६३१८, एमएच-२० एटी-२९८८, एमएच-२० एटी-६१८१, एमएच-२० बीटी-९४४५, एमएच-२० एटी-८६७७, एमएच-२० बीटी-९४४६, एमएच-२० एटी-७४४९, एमएच-२० एटी-५२१९ व एमएच-२० सीटी-४८३८ या क्रमांकाचे ट्रक जप्त करण्यात आले आहेत.२ ब्रासची पावती देऊन क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून देण्याचा सपाटा टाकळी अंबड येथील ठेकेदाराने सुरू केला आहे. पावतीपेक्षा जास्त वाळू भरून दिल्याप्रकरणी महसूल प्रशासनाने या ठेकेदारास नोटीसही बजावली आहे. प्रशासनाच्या या नोटिसीला धुडकावीत ठेकेदार आशिष शर्मा याने क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून देत शासनाचे मोठे नुकसान केले आहे. या प्रकरणी ठेकेदारावर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई होते की अभय दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.