खुलताबादमध्ये बनावट देशी दारूच्या ११ हजार बॉटल जप्त; एक्साइज विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:48 IST2025-08-25T19:48:02+5:302025-08-25T19:48:16+5:30

या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे

11,000 bottles of fake country liquor seized in Khultabad; Excise department takes action | खुलताबादमध्ये बनावट देशी दारूच्या ११ हजार बॉटल जप्त; एक्साइज विभागाची कारवाई

खुलताबादमध्ये बनावट देशी दारूच्या ११ हजार बॉटल जप्त; एक्साइज विभागाची कारवाई

खुलताबाद ( छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील देवळाणा शिवारातील एका शेतात रविवारी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारला. यावेळी बनावट देशी दारूच्या तब्बल ११ हजार बॉटल जप्त करण्यात आल्या असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. 

बाजार सावंगी ते टाकळी राजेराय रस्त्यावर देवळाणा शिवारातील एका शेतात बनावट दारूचा साथ असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यावरून पथकाने शेतातील शेडमध्ये छापा मारला असता. यावेळी येथे देशी दारुच्या 90 मि.ली. क्षमतेच्या एकूण 9000 सिलबंद बाटल्या, 180 मि.ली. क्षमतेच्या एकूण 1920 सिलबंद बाटल्या आढळून आल्या. पथकाने या साठयासह 01 चारचाकी, 02 दुचाकी व 06 मोबाईल असा एकूण 12 लाख 03 हजार 600/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

या प्रकरणी सागर प्रेमलाल जैस्वाल, वय-२८ वर्ष, रा. बाजारसावंगी, चेतन प्रकाश कुचे. वय- २४ वर्षे, रा.टाकळी राजेराय , दिपक प्रकाश कुचे, वय-१९ वर्षे, रा.टाकळी राजेराय, बाबुराव तात्याराव अधाणे, वय-५० वर्ष, रा.विरमगाव यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (अ, ई) 81, 83, 90, 108, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

ही कारवाई उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, दुय्यम निरीक्षक एल.बी. माटेकर ,  व्ही. एन. रानमाळकर, ए.टी.निमगीरे, गणेश उंडे, पी.व्ही.मुंगडे, बाळासाहेब नवले ,डि.एस. सूर्यवंशी, प्रविण पुरी, गणेश नागवे, रामजीवन भारती,  के.जी. मोटे, एच.ए. बारी, संतोष महाले, एम.एस. मुजमुले, एस.पी.रिंढे, एस.एस.खरात, मोतीलाल बहुरे, योगेश घुणावत, साईराज मोहिते, रवी मुरुडकर,  बी.के. नलावडे, एस.पी. बागडे  वाहन चालक शिवशंकर मूपडे, संजय गायकवाड, विनायक चव्हाण, अशपाक शेख, किसन सुंदडे  यांच्या पथकाने केली. 
.. 

Web Title: 11,000 bottles of fake country liquor seized in Khultabad; Excise department takes action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.