शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

आई आणि मावशीनेच विकले ११ वर्षीय मुलीला

By admin | Updated: July 21, 2016 01:17 IST

औरंगाबाद : आईची महती साऱ्या थोरा-मोठ्यांनी वर्णिली आहे. मावशीच्या मायेलाही तोड नाही. ‘माय मरो नि मावशी जगो’ असेही काहींनी म्हटले आहे.

औरंगाबाद : आईची महती साऱ्या थोरा-मोठ्यांनी वर्णिली आहे. मावशीच्या मायेलाही तोड नाही. ‘माय मरो नि मावशी जगो’ असेही काहींनी म्हटले आहे. पण या दोन अतिजवळच्या नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना आपल्या शहरात घडली आहे. देहविक्रय करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्वत:च्या ११ वर्षीय मुलीलाच आई आणि मावशीने दलालाच्या माध्यमातून अडीच लाखांत विक्री केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमध्ये एका शहरात पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा मारला तेव्हा तेथे औरंगाबादेतील ही चिमुकली पोलिसांना आढळली. राजस्थान पोलिसांच्या कारवाईमुळे औरंगाबादेतील ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात त्या निर्दयी आई, मावशी, दलाल आणि मुंबईतील एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आई सुशीला (४०,नाव बदलले आहे), मावशी उषा (३२, दोन्ही रा. मुुकुंदवाडी रेल्वे रुळ परिसर), दलाल नितीन रोकडे (रा. वडीगोद्री,ता. अंबड, जि.जालना) आणि चिमुकलीला खरेदी करणारी मुंबईतील ग्राहक पूजा अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, सुशीला हिचा पती मृत झालेला आहे. सुशीला हीस स्वाती (११) आणि अर्पिता (९, दोन्ही मुलींची नावे बदलली आहेत) या मुली आहेत. दलाल नितीनसह सुशीला आणि उषा या दोन्ही बहिणी मुकुंदवाडीतील रेल्वे रुळ परिसरात राहतात. या दोन्ही मुली संगोपन आणि शिक्षणासाठी पाच ते सहा वर्षांपूर्वी तिने छावणीतील विद्यादीप बालगृहात दाखल केलेल्या होत्या. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे १४ एप्रिल रोजी सुशीला आणि नितीन हा बालगृहातून दोन्ही मुलींना घरी घेऊन गेले. या दोन्ही मुलींना त्यांच्यासोबत पाठविण्यास बालगृहाच्या अधीक्षिका तयार नव्हत्या. त्यावेळी त्यांनी वॉर्डन यांच्याशी भांडण करून शाळेतून टी.सी. काढून घेतल्या आणि दोन्ही मुलींचे आम्हीच शिक्षण करणार असल्याचे सांगितले. दोन्ही मुलींची आईच त्यांचा सांभाळ करण्यास तयार असल्याने त्यांना बालगृहातून सोडण्यात आले. (पान ५ वर)अडीच लाखांत सौदाआरोपी उषा हिचे मुंबई, पुणे येथे सतत ये-जा असते. मुंबईतील पूजा हिच्यासोबत तिची ओळख आहे. पूजा हिने दहा-अकरा वर्षाच्या मुलीला देह व्यवसाय करणाऱ्या क्षेत्रात ग्राहकांकडून मोठी मागणी असते असे उषा हिला सांगितले. ४त्यामुळे स्वाती आणि अर्पिता यांची विक्री करून श्रीमंत होण्याचे स्वप्न उषाने सुशीलास दाखवले. सुशीलाही पैशाच्या लोभापोटी पोटच्या दोन्ही गोळ्यांची विक्री करण्यास तयार झाली आणि महिनाभरापूर्वी ते मुंबईत दोन्ही मुलींना विक्री करण्यासाठी पूजाच्या घरी घेऊन गेले. तेथे स्वाती हिची अडीच लाखांत पूजा हिला विक्री करण्यात आली. ४यावेळी तिच्याकडून पन्नास हजार रुपये तिने सुशीला आणि पूजाला दिले. उर्वरित रक्कम महिनाभरात मिळेल, त्यावेळी अर्पिता हिलाही खरेदी करते, असे पूजाने त्यांना सांगितले. स्वातीला त्यांच्याकडे सोपवून आरोपी अर्पितासह औरंगाबादला परतले.