शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सखींना घडणार १०० वर्षांची मनोरंजक बॉलीवूड सफर

By admin | Updated: December 28, 2015 00:24 IST

औरंगाबाद : सखींनो, थोडे कडू, थोडे गोड गेलेल्या या मावळत्या वर्षाला निरोप देण्याची एक आगळीवेगळी शक्कल तुमच्या लाडक्या ‘लोकमत सखी’ने तुमच्यासाठी लढविली आहे.

औरंगाबाद : सखींनो, थोडे कडू, थोडे गोड गेलेल्या या मावळत्या वर्षाला निरोप देण्याची एक आगळीवेगळी शक्कल तुमच्या लाडक्या ‘लोकमत सखी’ने तुमच्यासाठी लढविली आहे. लोकमत सखीने खास सखी मंचच्या सदस्यांसाठी २९ डिसेंबर रोजी ‘१०० वर्षांची बॉलीवूडची सफर’ घडवून आणणाऱ्या गीत, संगीत, नृत्याच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.सखी मंच व सारा बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१०० ईअर्स आॅफ बॉलीवूड’ हा संगीतप्रधान कार्यक्रम घेण्यात येत आहे. बॉलीवूडचा मागील १०० वर्षांचा वैभवशाली इतिहासपट यानिमित्ताने सखींसमोर मांडण्यात येणार आहे. लोकमत भवन येथील लॉनमध्ये सायंकाळी ५.३० वाजता या संगीतमय सफरीला सुरुवात होईल. ताज्या, दमदार आवाजाचे गायक जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी, गायिका दीपिका दातार व अवंतिका पांडे जुन्या, नवीन चित्रपटांतील सदाबहार गाणी सादर करणार आहेत. प्रसिद्ध अभिनेता राहुल सोलापूरकर हे या संगीताच्या सुरेल प्रवासाचे निवेदन करणार आहेत. सखी मंचचा हा वर्षअखेरचा सोहळा आहे. यात फक्त सखी मंचच्या सदस्यांनाच सहभागी होता येणार असून, येताना सखी मंचचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाला लोकमत भवनच्या पाठीमागील गेटने प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व सखी मंच सदस्यांना या सुरेल सफरीस येण्याचे आवाहन आयोजक ांतर्फे करण्यात आले आहे. सारा बिल्डर्स हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.