शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

टेम्पोसह १० लाखांची देशी दारू भस्म; अपघातस्थळी धाव घेतलेल्या तळीरामांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 3:21 PM

डोंगरगाव - शेलाटी फाट्यानजीक असलेल्या छोट्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

ठळक मुद्देविजेच्या पोलवर वाहन आदळून घडली घटना वाहनावर तार पडल्याने क्षणार्धात सगळे भस्म झालेचालकाने बाहेर उडी मारल्याने जीवितहानी टळली

पिशोर ( औरंगाबाद ) : देशी दारूने भरलेले वाहन विजेच्या मुख्य खांबावर आदळल्याने वीजतार पडून लागलेल्या आगीत वाहनासह संपूर्ण देशी दारू भस्म झाली. ही घटना रविवारी दुपारी डोंगरगाव शेलाटी फाट्यानजीक बाबरा रस्त्यावर घडली. या आगीत दहा लाखांची देशी दारू व वाहनासह सुमारे १३ लाखांच्या मुद्देमालाचा कोळसा झाला.

औरंगाबाद येथून कन्नड तालुक्यातील चिंचोली तसेच सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील परवानाधारक देशी दारू दुकानात देशी दारूचा पुरवठा करण्यात येतो. रविवारी वाहन (क्र. एमएच २० डीई ४२५१) देशी दारुचे बॉक्स भरून बाबरा - नाचनवेल रस्त्यावरून जात होते. डोंगरगाव - शेलाटी फाट्यानजीक असलेल्या छोट्या वळणावर चालक गणेश कळम यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज पुरवठ्याच्या मुख्य खांबावर हे वाहन जोराने आदळले. यात वीज तार तुटून वाहनावर पडल्याने आग लागली. दारूने पेट घेतल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. यामुळे संपूर्ण देशी दारूसह वाहनाचा कोळसा झाला. पिशोर पोलीस ठाण्याचे सपोनि. बालाजी वैद्य यांनी स. उपनिरीक्षक माधव जरारे, चालक सरवर पठाण यांच्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. औरंगाबाद येथून मालक नरेंद्र जैस्वाल हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. या आगीत सुमारे दहा लाखांची देशी दारू तसेच वाहन असे सुमारे तेरा लाख रुपयांच्या मुद्देमालाचा कोळसा झाल्याचे सपोनि. वैद्य यांनी सांगितले.

तळीरामांची निराशादेशी दारूच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी पंचक्रोशीत पसरताच तळीरामांनी हातची कामे सोडून तिकडे धाव घेतली. मात्र, तेथे गेल्यानंतर वाहनाने संपूर्ण पेट घेतलेला असल्याने त्यांच्या हाती काहीही पडले नाही. यामुळे त्यांचा हिरमोड झाला.

उडी मारल्याने वाचला चालकवाहनावरील नियंत्रण सुटून वाहन विजेच्या खांबाला धडकल्याने वीज तार तुटून आग लागली. यात चालक गणेश कळम यांनी तत्काळ उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. वाहनात इतर कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. दारू ज्वलनशील पदार्थ असल्याने घटनास्थळी मोठी आग लागली होती.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद