पालोदजवळ खासगी बस उलटली; एकाचा मृत्यू, 21 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 09:51 AM2020-01-03T09:51:02+5:302020-01-03T11:31:30+5:30

यात्रेकरूंना गंगासागर येथे घेऊन जाणारी खासगी बस पालोदजवळ रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना समोर आली आहे.

1 dead and 21 injured in accident near palod in aurangabad | पालोदजवळ खासगी बस उलटली; एकाचा मृत्यू, 21 जण जखमी

पालोदजवळ खासगी बस उलटली; एकाचा मृत्यू, 21 जण जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देयात्रेकरूंना गंगासागर येथे घेऊन जाणारी खासगी बस पालोदजवळ रस्त्याच्या कडेला पलटीअपघातात एकाचा मृत्यू झाला असून 21 प्रवाशी जखमीजखमींपैकी 13 प्रवाशी हे गंभीर जखमी

सिल्लोड - यात्रेकरूंना गंगासागर येथे घेऊन जाणारी खासगी बस पालोदजवळ रस्त्याच्या कडेला उलटली असल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 21 प्रवाशी जखमी झाले आहे. जखमींपैकी 13 प्रवाशी हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना औरंगाबाद येथे उपचारसाठी हलवण्यात आले आहे. खाजगी बस खराब रस्ते, दाट धुके आणि नशेत असलेल्या चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक आहे. 

मिळलेल्या माहितीनुसार, दामोदर लक्ष्मण खैरनार यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.  खैरनार हे मुंबईचे रहिवासी असून हे बेस्टमधून वर्षभरापूर्वी निवृत्त झाले होते. ते पत्नी व नातेवाईकांसह गंगासागरला जात होते. ते पत्नी व नातेवाईकांसह गंगासागरला जात होते. या अपघातात त्यांची पत्नी जयश्री दामोदर खैरनार ९ वय 53 रा.पिंपळगाव वाभाडी जि. नाशिक ) यासुद्धा जखमी आहेत. जखमीमध्ये सर्व जेष्ठ नागरिक असून, घटना घडल्यानंतर चालक फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि किरण  बिडवे, अजिंठा पोलीस ठाण्याचे सपोनि किरण आहेर, कर्मचारी भगवान भिसे यांनी घटनास्थळावरून पोलीस वाहनातून जखमींना उपचारासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

अपघातात जखमी झालेल्या प्रवास्यांची नावे अशी:
सखुबाई कचरू पांडव वय 55 वर्ष रा. नाशिक, सविता अरुण परे वय 40 वर्ष रा. वडोदबाजार  ता.फुलब्रि,इंदूबाई कैलास महाजन रा.सातपूर जि.नाशिक, कमल तुकाराम सानप वय 50 वर्ष रा. नाशिक,सुनंदा रेवती सांगळे वय 55 रा. नाशिक, विजया दिनकरराव शेळके वय 59 रा. सातपूर जि. नाशिक, सुनंदा नामदेव मोरे वय 51 वर्ष रा.मुंबई, निर्मळ संतोष खैरनार वय 64 वर्ष रा.मुंबई, अरुण गोपाळ गांगुर्डे वय 60 वर्ष रा. नाशिक, मंदाकिनी विजय पगारे वय 62 रा.धुळे,भास्कर कारभारी गांगुर्डे वय 54 वर्ष रा.आडगाव जिल्हा नाशिक, सुमन काळू कडाळे वय 50 वर्ष रा. आडगाव जिल्हा नाशिक, सुनंदा सुखदेव शिंदे वय 61 वर्ष रा.आडगाव जि. नाशिक, सुखदेव खडु शिंदे वय 67 वर्ष रा.आडगाव जि. नाशिक, कुसुम निंबा पवार वय 55 वर्ष रा. नाशिक, जिजाबाई बाबुराव नर्गे वय 60 वर्ष रा. नागापूर ता. नांदगाव,शकुंतला अर्जुन बोडखे वय 59 वर्ष रा. नाशिक, ललिता अरुण गांगुर्डे वय 53 वर्ष रा. नाशिक, मंगुला गोरखनाथ पगारे वय 53 रा.सटाणा जि. नाशिक, सिमा भिकाजी केवट वय 50 वर्ष रा. वडोदबाजार ता.फ़ुलंब्री, , कोळीबा जनार्दन घाटे वय 56 वर्ष रा. नाशिक, काळू झुंबर कडाळे वय 67 रा.आडगाव जि. नाशिक असे आहे.

Web Title: 1 dead and 21 injured in accident near palod in aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.