शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी अध्यक्षपदी देवराव भोंगळे तर उपाध्यक्षपदी कृष्णा सहारे

By admin | Updated: March 22, 2017 00:45 IST

येथील जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपाचे देवराव भोंगळे यांची तर उपाध्यक्षपदी भाजपाचेच कृष्णा सहारे यांची निवड झाली.

भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांत निवडणूक : तीन अपक्ष सदस्यांचे भाजपच्या बाजूने मतदानचंद्रपूर : येथील जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपाचे देवराव भोंगळे यांची तर उपाध्यक्षपदी भाजपाचेच कृष्णा सहारे यांची निवड झाली. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दोन्ही पदांसाठी उमेदवार उभे केले. मात्र दोन्ही पदांवर ३६ विरूद्ध २० अशी मते घेत भाजपाचे देवराव भोंगळे व कृष्णा सहारे हे विजयी झालेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झालेले देवराव भोंगळे हे पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा-घोसरी या जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून आले असून त्यांनी काँग्रेसचे दिग्गज विनोद अहीरकर यांचा पराभव केला होता. त्यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय मानले जाते. भोंगळे यांनी यापूर्वी घुग्घुस जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून येत जिल्हा परिषद बांधकाम व शिक्षण सभापती पद भुषविले आहे. भाजप पक्षाने ३३ जागा जिंकून स्पष्ट बहुमत सिद्ध होताच त्यांची पक्षाचे गटनेते म्हणून यापुर्वीच निवड झाली होती. त्यामुळे अध्यक्षपदी त्यांचीच वर्णी लागणार, हे निश्चित होते. मंगळवारच्या सभेत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. तर उपाध्यक्षपदी निवड झालेले कृष्णा सहारे हे ब्रह्मपुरी तालुक्यातील अऱ्हेरनवरगाव-नान्हेरी जि. प. क्षेत्रातून निवडून आले आहेत. कृष्णा सहारे यांची जिल्हा परिषदेवर निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असून या पहिल्या संधीतच त्यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. कृष्णा सहारे यांनी सन १९९९-२००० ला ब्रह्मपुरी पंचायत समितीचे उपसभापती पद भुषविले आहे. निवडणुकीनंतर नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांची वाहनावर बँडच्या गजरात जिल्हा परिषदेतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांनी अद्याप पदभार स्वीकारला नसून ३ एप्रिलला पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारले जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)दिग्गजांना आता सभापतिपदाची आसभाजपा गटनेतेपदी देवराव भोंगळे यांची यापुर्वीच पक्षाच्या पुढाऱ्यांनी निवड केली होती. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागेल हे आधीच निश्चीत होते. मात्र उपाध्यक्षपदासाठी नागराज गेडाम, संजय गजपुरे, ब्रिजभुषण पाझारे, अर्चन जिवतोड या दिग्गजांची नावे चर्चेत होती. मात्र ऐनवेळी वेळी कृष्णा सहारे यांचे नामांकन भरण्यात आले. त्यामुळे चर्चेतील दिग्गजांची नावे आपोआपच मागे सरली. त्यातील काहींना सभापतीपदांची शक्यता आहे. काँग्रेसच्याउमेदवाराला २० मतेअध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून गोदरू पाटील जुमनाके यांचे तर उपाध्यक्षपदासाठी रमाकांत लोधे यांचे नामांकण दाखल करण्यात आले. मात्र गोदरू पाटील जुमनाके यांचा देवराव भोंगळे यांनी तर रमाकांत लोधे यांचा कृष्णा सहारे यांनी २० विरूद्ध ३६ असा पराभव केला. ३ अपक्ष सदस्य हे भाजपाकडून राहिले. ग्रामीण विकासाला चालना देणारजिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाचा कणा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्रामीण विकास व शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यासाठी आपला प्रयत्न राहील. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनात आपण काम करणार असून त्यांच्याकडून अधिकाअधिक निधी मंजूर करून विकास साधण्याचा आपला प्रयत्न राहील. - देवराव भोंगळे, नवनियुक्त जि. प. अध्यक्ष, चंद्रपूर.शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करणार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मागासलेपणा दूर झाल्याशिवाय विकास शक्य नाही. शेतकरी हिताच्या योजना राबवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. वीज, रस्ते, पाणी आदी समस्या गंभीर असून या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल. मतदारांनी व पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थक ठरवीन.- कृष्णा सहारे, नवनियुक्त जि. प. उपाध्यक्ष, चंद्रपूर.