पेट्रोल दरवाढीविरुद्ध युवक काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST2021-06-11T04:20:03+5:302021-06-11T04:20:03+5:30

बल्लारपूर : माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोल दरवाढीविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोलपंपासमोर गुरुवारी निषेध आंदोलन करण्यात आले. ...

Youth Congress agitation against petrol price hike | पेट्रोल दरवाढीविरुद्ध युवक काँग्रेसचे आंदोलन

पेट्रोल दरवाढीविरुद्ध युवक काँग्रेसचे आंदोलन

बल्लारपूर : माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोल दरवाढीविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोलपंपासमोर गुरुवारी निषेध आंदोलन करण्यात आले.

जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. पेट्रोल, डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. त्याचा मोठा परिणाम दळणवळणावर झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या. या महागाईने नागरिकांना आर्थिक विवंचनेत टाकले असतानाच पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला. केंद्र सरकारला जाग येण्यासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील युवक काँग्रेसने हे आंदोलन केले. यावेळी बल्लारपूरचे अध्यक्ष चेतन गेडाम, सिकंदर खान, शंकर महाकाली, अजहर खान, संदीप नाक्षिणे, चंचल मून, सोहेल खान, तपन उगले, श्रीकांत गुजरकर आदी उपस्थित होते.

===Photopath===

100621\img-20210610-wa0013.jpg

===Caption===

पेट्रोल ने मरलेल्या नाबाद सेंच्युरी विरुद्ध युवक काँग्रेसचे आक्रोश आंदोलन!

Web Title: Youth Congress agitation against petrol price hike