ब्रह्मपुरीच्या तापमानात यावर्षी वाढ

By Admin | Updated: June 9, 2014 23:34 IST2014-06-09T23:34:25+5:302014-06-09T23:34:25+5:30

ब्रह्मपुरीच्या वाढत्या तापमानाला रोखण्यासाठी प्रशासन व नागरिकांना सहभाग आवश्यक आहे. विदर्भात ब्रह्मपुरीच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. पुढेही हिच स्थिती कायम राहिली तर, येत्या काही काळात

This year's increase in temperature of Brahmapuri | ब्रह्मपुरीच्या तापमानात यावर्षी वाढ

ब्रह्मपुरीच्या तापमानात यावर्षी वाढ

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरीच्या वाढत्या तापमानाला रोखण्यासाठी प्रशासन व नागरिकांना सहभाग आवश्यक आहे. विदर्भात ब्रह्मपुरीच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. पुढेही हिच स्थिती कायम राहिली तर, येत्या काही काळात ब्रह्मपुरीचे वाळवंट होण्याची चिन्ह दिसत आहेत. ते होऊ नये यासाठी झाडे लावून पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात वृक्षांची संख्या अतिशय कमी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून वृक्षारोपण करण्यात आले नाही. झाड लावून मोकळे होणे एवढय़ापर्यंतचे मात्र काम कायम आहे. झाडे लावल्यावर त्यांना जगविण्याचे कार्य होत नाही. अनेक खुल्या क्षेत्रावर अतिक्रमण आहेत. ते काढून प्रशासनाच्या वतीने झाडे लावून जगविणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या कडेला लावण्याचे कार्य होत नाही. शहराच्या बाहेर मोकळ्या जागा ओसाड आहेत. त्यामुळे तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे.
ब्रह्मपुरीची जमीन खडकाळ व वाळू मिश्रीत आहे. लाल रंगाची माती असल्याने ती जास्त तापत असते. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे, ब्रह्मपुरी शहरात व खुल्या जमिनीवर लावणे आवश्यक आहे. सामाजिक वनीकरणाचे येथे कार्यालय आहे. परंतु झाडे लागवडीचे कार्य त्यांच्याकडूनही नगण्यच आहे. अनेक कार्यालयांना समोर खुले मैदान आहेत. परंतु झाडे लावून जगविणे अधिकार्‍यांनाही सुचले नाही. त्यामुळे शहरच्या तापमानात वाढ झाली आहे.
येत्या पावसाळ्यात नगरपालिका अन्य सामाजिक संस्था व सामाजिक संघटना यांना एकत्र घेऊन झाडे लावल्याचा प्रभावी कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाही तर ब्रह्मपुरी शहर येत्या काही वर्षात वाळवंत झाल्याशिवाय राहणार नाही. हे दोन ते तीन दिवसांच्या तापमानाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: This year's increase in temperature of Brahmapuri