शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा शंकरपुरात निघणार नाही मखराचा बैल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST

शंकरपूर येथे दरवर्षी मखरातील पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मखराचा बैल निघत असल्याने परिसरातील नागरिकांची शंकरपुरात प्रचंड गर्दी उसळते. परंतु यावर्षी शासकीय आदेशानुसार पोळा भरणार नसल्यामुळे मखराचा बैल निघणार नाही. मखराचा बैल देशमुख वाड्यातून निघत होता. देशमुख यांनी सर्व जमीन डहाके कुटुंबाला विकली.

ठळक मुद्देमखराचा बैल पंचक्रोशीत प्रसिद्ध : कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या आदेश पालन करणार

आमोद गौरकर।लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : दरवर्षी येथील मखरातील बैलाचा पोळा पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे प्रशासनाने मनाई केल्याने आदेश पालन करण्याचा निर्णय डहाके कुटुंबियांनी घेतला आहे.शंकरपूर येथे दरवर्षी मखरातील पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मखराचा बैल निघत असल्याने परिसरातील नागरिकांची शंकरपुरात प्रचंड गर्दी उसळते. परंतु यावर्षी शासकीय आदेशानुसार पोळा भरणार नसल्यामुळे मखराचा बैल निघणार नाही. मखराचा बैल देशमुख वाड्यातून निघत होता. देशमुख यांनी सर्व जमीन डहाके कुटुंबाला विकली. त्यानंतर डहाके कुटुंबातर्फे मखराचा बैल गावात फिरविला जातो. शेतकरी, महिला बैलांची पूजा करतात. ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, १९३० च्या सुमारास शंकरपूर येथे गायी, बैल व अन्य पाळीव जनावरांवर आजाराची साथ आली होती. त्यामुळे देशमुख कुटुंबाला एका महाराजाने या आजाराची साथ कमी करण्यासाठी वेशीवर बैल व त्याच्या डोक्यावर मखर घेऊन फिरविला होता. तेव्हापासून पोळ्याला मखराचा बैल काढला जातो. हा मखर लाकडापासून तयार केला असून षटकोनी आकाराचा आहे. सर्व खांबावर दिवे लावतात. ही परंपरा आजही देशमुख कुटुंंबानंतर राजू डहाके यांचे कुटुंब जोपासत आहे.असे होते बैलाचे पूजनसजवलेला मखराचा बैल सर्वप्रथम हनुमान मंदिर नंतर तेथून बाजार मैदानात आणला जाता. तिथे पूजा केली जाते. गावाच्या मध्यभागी तोरण बांधण्याची परंपरा आहे. मखराचा बैल खाली आल्यानंतर तोरण तोडले जाते. तोरण तोडेपर्यंत मखराच्या बैलासमोर दुसरी बैलजोडी निघत नाही. परंतु यावेळी मखराचा बैल पोळ्याच्या दिवशी निघणार नाही. परिणामी, गावकऱ्यांसोबतच परिसरातील नागरिकांचाही हिरमोड झाला आहे. शासकीय आदेशाचे पालन करायचे आहे. त्यामुळे यंदा मखराचा बैल गावात न काढता घरीच विधिवत पूजा करण्यात येणार आहे, अशी माहिती राजू डहाके यांनी दिली.

टॅग्स :Socialसामाजिक