शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

सनप्लॅग कोळसा खाणीत कामगारांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 06:00 IST

वरोरा तालुक्यातील बेलगाव गावाच्या शिवारात भूमिगत कोळसा खाण असून सनप्लॅग आयरन अ‍ॅन्ड स्टील प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवत आहे. मागील कित्येक वर्षापासून या कोळसा खाणीतून कोळसा काढून वाहनाद्वारे डोंगरगाव येथील रेल्वे साईडिंगवर कोळशाची वाहतूक केली जाते. सध्या कंपनीमध्ये शेकडो कामगार कार्यरत आहेत.

ठळक मुद्देदोन दिवसांपासून उत्पादन ठप्प : व्यवस्थापनाला मोठा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : सनप्लॅग भूमीगत कोळसा खाण बेलगाव येथील कामगारांनी विविध मागण्याकरिता मागील एक दिवसापासून काम बंद आंदोलन सुरु केल्याने कंपनीचे उत्पादन कार्य ठप्प झाले आहे. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केल्याने कंपनी व्यवस्थापन व प्रशासनापुढे तूर्तास पेच उभा ठाकला आहे.वरोरा तालुक्यातील बेलगाव गावाच्या शिवारात भूमिगत कोळसा खाण असून सनप्लॅग आयरन अ‍ॅन्ड स्टील प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवत आहे. मागील कित्येक वर्षापासून या कोळसा खाणीतून कोळसा काढून वाहनाद्वारे डोंगरगाव येथील रेल्वे साईडिंगवर कोळशाची वाहतूक केली जाते. सध्या कंपनीमध्ये शेकडो कामगार कार्यरत आहेत. कामगारांना भूमिगत कोळसा खाणीत काम करावे लागत असल्याने त्यांना कोल इंडियाच्या नियमानुसार वेतन देण्यात यावे, वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात, कॅन्टींग सुविधा, समान काम समान वेतन देण्यात यावे आदी मागण्यासंदर्भात लालझेंडा कोल माईन्स मजदूर युनियनच्या वतीने कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात सर्वच कामगार सहभागी झाले असल्याने दोन दिवसांपासून कंपनीचे उत्पादन ठप्प झाले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे. सनप्लॅग कंपनी प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.कोळसा खाण खासगी असली तरी ती खाण कोल इंडियाच्या नियमानुसार चालते. त्यामुळे कोल इंडियाच्या समझोत्यानुसार कामगारांना वेतन देण्यात यावे. समान काम समान वेतन जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार.- डी.के. दत्ता, अध्यक्ष, लालझेंडा कोल माईन्स मजदूर युनियन