काम सुरु: लवकरच मिळणार
By Admin | Updated: May 7, 2014 02:06 IST2014-05-07T02:06:20+5:302014-05-07T02:06:20+5:30
ई-पंचायत उपक्रमांतर्गत शासनातर्फे संग्राम प्रकल्प राज्यभर राबविला जात आहे. याअंतर्गत

काम सुरु: लवकरच मिळणार
ग्रामपंचायीची अद्ययावत माहिती ई-पंचायतसाठी अधिकार्यांची धावपळ
चंद्रपूर : ई-पंचायत उपक्रमांतर्गत शासनातर्फे संग्राम प्रकल्प राज्यभर राबविला जात आहे. याअंतर्गत गावातील सर्व माहिती संकलीत करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकार्यांनी तालुकास्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे. या प्रकल्पाचे काम कोणत्या स्थितीत आहे. याबाबतचा अहवाल मुख्य कार्यपालन अधिकार्यांना संबंधित अधिकार्यांनी सादर केला आहे. येत्या काही दिवसात सर्व ग्रामपंचायतींची माहिती अद्यावत करण्यात येणार आहे. या कामासाठी जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांची चांगलीच धावपळ होत आहे. राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठविण्यात आले असून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे सुचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. आशुतोष सलिल यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीसाठी एका क्षेत्रीय अधिकार्याची निवड करून ३० एप्रिलपर्यंत संबंधित पंचायत समितीमध्ये भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागप्रमुखांनी दिलेल्या कालावधीत संबंधित पंचायत समितीमध्ये उपस्थित राहून संग्राम प्रकल्पांतर्गत आज्ञावलीमध्ये भरलेली माहिती प्रमाणित केली किंवा नाही, याची तपासणी केली. त्यानंतर १ मे रोजी संबंधित क्षेत्रीय अधिकार्यांनी सीईओंकडे संग्राम प्रकल्पाबाबतचा अहवाल सादर केला. काही पंचायत समित्यांमध्ये अद्यापही या प्रकल्पाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नसल्याचे समोर आले आहे. इंटरनेटचे युग असून एका बटनाच्या क्लिकवर जगातील माहिती मिळू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय मालमत्ता, शेतजमिनीचे क्षेत्र, रस्ते यासह विविध माहिती ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असल्यानंतरही ती वरिष्ठ कार्यालयात वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ही माहिती तत्काळ मिळावी, या हेतूने शासनाने ई-पंचायत उपक्रमांतर्गत संग्राम प्रकल्प राबविला. यांतर्गत सर्व माहिती संगणकावर ‘अपलोड’ केली जाणार आहे. शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे एक पत्र चंद्रपूर जिल्हा परिषदेला २३ एप्रिल रोजी पाठविण्यात आले. त्यानुसार मुख्य कार्यपालन अधिकार्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विभागप्रमुखांची निवड करून काटेकोरपणे तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या कामात कोणत्याही क्षेत्रीय अधिकार्यांनी हयगय करू नये, असे नमूद करण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पाची जबाबदारी दिलेल्या सर्व अधिकार्यांनी आपली कामे बाजूला सारून पंचायत समितीस्तरावर जाऊन प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या आज्ञावलीची तपासणी केली आहे. या प्रकल्पामुळे अधिकार्यांसोबत नागरिकांनाही सर्व माहिती आॅनलाईन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी) अशी राहील माहिती ४ग्राम पंचायत स्तरावर शासनाची मालमत्ता, प्रशासकीय इमारत, लोकसंख्या, सरपंच, सदस्य संख्या, साक्षरतेचे प्रमाण, रोजगार, उद्योग, पाणी पुरवठा, गावातील विकास कामे, बाजार, व्यापार आदींची अद्यावत माहिती मिळणार आहे.