शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा सामना करण्यासाठी गांर्भीर्याने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नविन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन मा. सा. कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : कोरोना विषाणू आजार प्रतिबंध जिल्हास्तरीय कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आरोग्य विभागावरचा ताण वाढला आहे. तरीही जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केल्या.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नविन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन मा. सा. कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.या कार्यशाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, कोरोनाचे नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमचंद्र किन्नाके, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, विस्तार अधिकारी (आरोग्य), महानगरपालिकेचे वैद्यकीय, जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांनी सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना, जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनासंदर्भात खबरदारी व उपायोजना करणे महत्त्वपूर्ण आहे. तालुकास्तरावर कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. तसेच कोणत्याही प्रकारची अफवा येऊ नये, यासाठीदेखील प्रयत्न करावे.प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कॉरेंटाईन केंद्र स्थापन होणार आहे, असेदेखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जिल्ह्याच्या तसेच प्रत्येक तहसील ठिकाणी कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले.आपत्ती व आमदार निधी उपलब्धजिल्ह्यामध्ये कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आपत्ती निधी तसेच आमदार निधीसुद्धा उपलब्ध होणार आहे. ज्या कोरोना संशयित रुग्णांना होम क्वॉरेंटाईन करणार आहे, अशा रुग्णांच्या बोटावर शाई लावण्यात येत आहे. शासकीय सर्व बैठका रद्द केल्या असून फक्त आपत्कालिन बैठका घेण्यात येणार आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी स्पष्ट केले. कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाच्या निर्देशाचे सर्वांनी पालण करावे, स्वत:ची काळजी घ्यावी, तेव्हाच आपण या आपत्तीला सामोर जाऊ शकू, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.तालुकास्थळी कार्यशाळा घ्याजिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी सर्वच तालुकास्तरावर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधात्मक कार्यशाळा आयोजित करावी, तसेच त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.