शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरच्या नावाखाली महिलांची फसवणूक

By admin | Updated: April 25, 2015 01:25 IST

मानव विकास कार्यालयातील कर्मचारी असल्याची बतावणी करून ग्रामीण भागातील महिलांसाठी शासनाची अनुदानावर ....

कोठारी : मानव विकास कार्यालयातील कर्मचारी असल्याची बतावणी करून ग्रामीण भागातील महिलांसाठी शासनाची अनुदानावर गॅस कनेक्शन पुरवठा करण्याची योजना आहे, अशी माहिती देत प्रती महिलांकडून ५०० ते १००० रुपये जमा करून भामटा फरार झाला. या फसवणूक प्रकरणी लाठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाळकृष्ण सयाम असे भामट्याचे नाव असल्याची माहिती आहे.मानव विकास कार्यक्रमांतर्गत शासन ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन अनुदानावर देण्याची योजना असल्याचे बचत गटातील महिलांना भामट्याने सांगितले. यासाठी अनुसूचित जाती वर्गातील प्रती कनेक्शन १७०० रुपये व इतर मागास जातीतील वर्गातील लाभार्थ्यांसाठी सिलिंडरची किंमत २२०० रुपये आहे, असे सांगत प्रती महिलांकडून ५०० ते १००० रुपये भामट्याने गोळा केले. त्यानंतर सर्व कागदपत्राची मागणी केली. त्यासाठी त्याने तोहोगाव, पाचगाव, आर्वी, वेजगाव, सरांडी, लाठी आदी गावातील महिलांशी संपर्क करून २०० महिलांकडून तीन लाखांच्यावर ऐवज जमा केला. हा प्रकार जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडला. शासनाची योजना असल्याने महिलांनीही कोणतीही चौकशी न करता सरपणाची कटकट कायम मिटणार या उद्देशापोटी पैसे व कागदपत्रे भराभर जमा केली. सिलिंडरचा कनेक्शन १५ दिवसात देण्याचे आश्वासन भामट्याने दिले. माात्र तीन महिने लोटूनही गॅस कनेक्शन घरापर्यंत पोहचले नाही. बाळकृष्ण सयाम याने दिलेले भ्रमणध्वनी क्रमांक बंद करून तो पसार झाला. अखेर सदर बाब तोहगावचे उपसरपंच फिरोज पठाण यांना महिलांनी सागितली. याबाबत त्यांनी मानव विकास चंद्रपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेतली असता, अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगत बाळकृष्ण सयाम नावाचा कुणीही काम करीत नसल्याची माहिती मिळाली. या आधारे तोहोगाव परिसरातील महिलांनी लाठी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलीस भामट्याचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)