शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी स्वयंभू विचारातून विकास साधावा

By admin | Updated: October 18, 2015 01:04 IST

२१व्या शतकातील सर्वच क्षेत्रातील आव्हानांचा स्वीकार करण्याकरिता महिलांनी सज्ज व्हावे.

जोरगेवार : महिला विकास कार्यक्रमचंद्रपूर: २१व्या शतकातील सर्वच क्षेत्रातील आव्हानांचा स्वीकार करण्याकरिता महिलांनी सज्ज व्हावे. समाजातील तळागळातील प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. त्याचप्रमाणे महिलांनी आपल्या समस्या सोडविण्याकरिता संघटनात्मक शक्तीचा प्रभावी वापर केला आहे. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण आज वाढलेले असून कर्तृत्वाची यशोशिखरे ती जिंकत आहे. तेव्हा महिलांनी आपल्या स्वयंभू विचारांचा उपयोग करुन संघटितपणातून विकास साधावा, असे आवाहन शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी केले.युनिसेफ तथा जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ग्रामपंचायत पिपरी येथे आयोजित दीपशिखा किशोरी महिला विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी किशोर जोरगेवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा प्रमुख दीपक दापके, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख भारती दुधानी, उपजिल्हा प्रमुख माया पटले, सरपंच पारस पिंपळकर, अरुण तुराणकर, महिला शहर प्रमुख सायली येरणे, युनिसेफचे दिलीप देवतळे, वर्षा रामटेके, किरण अलोणे, चंदू माथने, गणेश आवारी, प्रवीण खनके, विश्वजीत शहा, नितीन नागरीकर, विलास वनकर, विनोद गोल्लजवार, विलास सोमलवार, मुन्ना जेगी आदींची उपस्थिती होती.तत्पूर्वी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. चिमुकल्यांच्या स्वागतगीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक कार्यक्रमाच्या संयोजिका शीतल उईके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता लीला नगराळे, रसिका मांडवकर, छाया ताठे यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)वनविभागाचे कार्यालय जीर्णावस्थेतकान्हाळगाव : कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पारडी येथील वनविभाग कार्यालयाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी नवीन इमारत व परिसरात संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)