अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:33 IST2021-01-08T05:33:05+5:302021-01-08T05:33:05+5:30

चंद्रपूर : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे समाधी वाॅर्ड जेल रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

Women felicitated by Akhil Bharatiya Mahatma Phule Samata Parishad | अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महिलांचा सत्कार

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महिलांचा सत्कार

चंद्रपूर : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे समाधी वाॅर्ड जेल रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष जगदीश जुनघरी, प्रमुख अतिथी म्हणून महानगर अध्यक्ष राजू साखरकर, महिला अध्यक्ष विजयश्री माटे, महिला जिल्हाध्यक्ष संध्या दुधलकर, जिल्हा संघटक पुरुषोत्तम टोंगे, उपाध्यक्ष अमित खारकर, सचिव सचिन तपासे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, देवराव निब्रड यांची उपस्थिती होती. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने कार्यकुशल महिला, सामाजिक कार्यात कर्तबगार शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. जयंतीनिमित्त राज्य स्काऊट गाईड पुरस्कारप्राप्त महिला शिक्षिका सुरेखा बोमनवार यांचा गौरव करण्यात आला. जुही बेहार कवयित्री व प्रियंका जीवतोडे उत्कृष्ट वक्तृत्व याबद्दल गौरविण्यात आले तर प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थी कुमारी गार्गी दुधलकर, काजल कालीवाले, कुलते, चहारे, बघेले यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सचिन तपासे, आभार पुरुषोत्तम टोंगे यांनी केले.

Web Title: Women felicitated by Akhil Bharatiya Mahatma Phule Samata Parishad