शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या बसमधून महिलेचे तीन लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

आपल्या सासूसह भद्रावती येथून नागपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये बसली. बसमध्ये गर्दी असल्यामुळे तिला तिकीट काढणे शक्य झाले नाही. तोपर्यंत बस वरोराजवळ पोहोचली. तिकिटासाठी तिने पैसे काढण्याकरता बॅग तपासली असता तिला आपल्या बॅगमधील आठ तोळे सोने आणि तीन हजार रुपये एवढा ऐवज गायब असल्याचे लक्षात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा शहरात सातत्याने सोने चोरीच्या घटना वाढत असताना मंगळवारी एका महिलेच्या बॅगमधून प्रवासादरम्यान तीन लाखांचे दागिने लंपास केला.वर्षा निखाडे ही महिला आपल्या सासूसह भद्रावती येथून नागपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये बसली. बसमध्ये गर्दी असल्यामुळे तिला तिकीट काढणे शक्य झाले नाही. तोपर्यंत बस वरोराजवळ पोहोचली. तिकिटासाठी तिने पैसे काढण्याकरता बॅग तपासली असता तिला आपल्या बॅगमधील आठ तोळे सोने आणि तीन हजार रुपये एवढा ऐवज गायब असल्याचे लक्षात आले. तिने याची माहिती बस वाहकाला दिली आणि बस वरोरा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांची झडती घेतली. मात्र कुणाकडेही तो ऐवज आढळून आला नाही.नुकत्याच दोन-तीन घटनांमध्ये चोरटयांनी महिलांच्या अंगावरील सोने नेल्याच्या घटना ताज्या असतानाच आता चोरटे चक्क धावत्या बसमधून ऐवज लंपास करायला लागल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.भद्रावती येथे पाच वर्षीय मुलावर अत्याचार, आरोपी अटकेतभद्रावती : शहरातील झिंगूजी वार्ड येथे राहणाऱ्यापाच वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. यातील वसीम गफ्फार शेख (२८) रा. भंगाराम वार्ड असे आरोपीचे नाव आहे. वसीम शेख हा टाईल्सचे काम करण्याकरिता या परिसरात गेला असता तिथेच खेळणाºया आठ वर्षीय व पाच वर्षीय दोन मुलांना आरोपींने पतंग घेवून देण्याचे आमिष देवून त्यांना न.प. कार्यालयाच्या मागच्या परिसरात नेले. यातील पाच वर्षीय बालकावर अत्याचार केला. ही घटना दुपारी ५ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती संबंधित दोन्ही मुलांनी आपल्या आई- वडीलांना सांगताच त्यांनी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे. 

घोसरी येथील सरपंचासह दोन महिलांचा विनयभंगभद्रावती : तालुक्यातील घोसरी येथील महिला सरपंच व तिची मैत्रीण या दोघांना अश्लील शब्दात बोलून त्यांचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी घोसरी येथे घडली. या प्रकरणी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चंदू दडमल रा. घोसरी असे आरोपीचे नाव आहे. चंदू दडमल याने याच गावातील महिला सरपंच व तिच्या मैत्रिणीला अश्लिल शब्दात बोलून त्यांचा विनयभंग केला. यामुळे संतप्त झालेल्या महिला सरपंचांनी या प्रकरणाची भद्रावती पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी