शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने तासभर झोडपले

By admin | Updated: May 14, 2017 00:29 IST

तप्त उन्हामुळे नागरिक हैराण असतानाच शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळी पावसाने चंद्रपुरात कहर केला.

नागरिकांचे नुकसान : झाडे उन्मळून पडली, तारा तुटल्या, वीजपुरवठा खंडितलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तप्त उन्हामुळे नागरिक हैराण असतानाच शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळी पावसाने चंद्रपुरात कहर केला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी नागरिकांचे मोठे नुकसान झाले. वादळामुळे शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली. नागरिकांच्या घरातील बागबगिचे उद्ध्वस्त झाले. वीज तारा तुटल्याने वीज पुरवठा तब्बल तीन तास बंद होता. याशिवाय काही घरांचीही पडझड झाल्याची माहिती आहे.मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चंद्रपुरात उन्हाचा पारा चढायला सुरुवात झाली. एप्रिल महिन्यातच पारा ४५ अंशापार गेला. त्यानंतर मे महिन्यात तर चक्क ४६.४ तापमानाची नोंदही करण्यात आली. अंगाची लाही लाही होत असतानाच आज दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अचानक वातावरण बदलले. ढग दाटून आले आणि वादळी पावसाला सुरुवात झाली. उन्हाळा सुरु असल्यामुळे अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल, याची जाणीव नागरिकांना नव्हती. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक व्यावसायिक आपल्या दुकानाच्या समोर फुटपाथवर साहित्य लावून ठेवतात. वादळी पावसामुळे अनेक व्यावसायिकांचे हे साहित्य उडून गेले. शहरातील अनेक वॉर्डात, मुख्य रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. यात काही वाहनांच्या काचा फुटल्या. मात्र सुदैवाने जिवितहानी झाली नाही. याशिवाय अनेक ठिकाणच्या विद्युत तारा, केबल ताराही तुटल्या. त्यामुळे चंद्रपूर शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. जवळजवळ तासभर वादळी पावसाने थैमान मांडले होते. यात शहरातील काही घरेही पडल्याची माहिती आहे. अनेक विद्युत तारांवर झाडे पडली असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करताना वीज कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. दुपारी ४ वाजता खंडित झालेला वीज पुरवठा सायंकाळी ७ वाजता पूर्ववत झाला. जिल्ह्यात पाऊसचंद्रपूरसह मूल, सिंदेवाही, बल्लारपूर तालुक्यासह अन्य काही गावातही शनिवारी दुपारी वादळी पाऊस झाला. या ठिकाणीही अनेक झाडे उन्मळून पडली. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथे एका व्यक्तीच्या घराचे टिनाचे छप्पर उडाले. घरातील अन्नधान्य भिजून नुकसान झाले.नाल्या तुंबल्याचंद्रपुरात आज शनिवारी तासभर झालेल्या वादळी पावसामुळे मनपाचे नाले सफाईचे पितळ उघडे पडले. या पावसाने नाल्या तुंबून नाल्यातील घाण रस्यावर आली. त्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. केवळ एका तासाच्या पावसातची ही स्थिती बघायला मिळाली. पुढे पावसाळ्यात काय स्थिती असेल, याचा विचार न केलेलाच बरा !बालिकेचा मृत्यूलालपेठ परिसरातही जोरदार वादळ आले. या दरम्यान सुदामा बिंद यांच्या घराजवळ खेळत असलेल्या काजल गुप्ता (९) रा. लालपेठ हिच्या अंगावरच झाड कोसळले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. नऊ वर्षीय काजलचा असा दुर्दैवी अंत झाल्याने लालपेठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.