शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मूल-गडचिरोली रेल्वे मार्ग सुरू होईल का?

By admin | Updated: February 26, 2015 00:48 IST

गेल्या कित्येक वर्षापासून गडचिरोली येथे रेल्वे मार्ग सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. मात्र वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होत असल्याने...

सावली : गेल्या कित्येक वर्षापासून गडचिरोली येथे रेल्वे मार्ग सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. मात्र वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होत असल्याने कमी अडचणींचा असलेला गडचिरोली-मूल रेल्वे मार्ग सुरू करण्याची अशी मागणी परिसरातील नागरिकांनी दोन्ही खासदारांकडे केली आहे.चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर व चिमूर-गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली - मूल रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केल्यास हा प्रश्न तत्काळ निकाली लागू शकतो, असा आशावाद परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली ते वडसा रेल्वे मार्गाचे अंतर ५३ कि.मी. असून अनेक लहान मोठ्या नद्यांचा अडथळा आणि जंगलव्याप्त परिसरातील नक्षलवाद्यांची भीती आहे. या साऱ्या बाबी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाला गडचिरोली - वडसा रेल्वे मार्ग सुरू करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्या तुलनेत गडचिरोली जिल्हा मुख्यालयी रेल्वेची गरज आणि मागणी लक्षात घेता मूल येथून अवघ्या ४० कि.मी. अंतरावर असलेल्या गडचिरोलीसाठी रेल्वे मार्ग सुरू केल्यास हा मार्ग सर्वांसाठी सोईस्कर ठरणार आहे. या रेल्वे मार्गामुळे गडचिरोली ते मुंबई असा थेट प्रवास करणे गडचिरोलीकरांना व सावली तालुक्यातील नागरिकांना सोयीचे होणार आहे. या मार्गासाठी कमी प्रमाणात वनकायद्याच्या अडसर आणि वैनगंगा व उमा या दोनच नद्यांवर पुल बांधण्याची आवश्यकता भासणार आहे. शिवाय प्रवाशांसाठीही हा मार्ग कमी त्रासाचा होणार आहे. यासाठी दोन्ही खासदारांनी पुढाकार घेण्याची मागणी सावली परिसरातील नागरिकांची आहे. (तालुका प्रतिनिधी)