लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सार्ड’ (सोशल अॅक्शन फॉर रूरल डेव्हलपेंट) या संस्थेच्या वतीने मध्य चांदा वनविभागातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा बिटात संस्थेच्या व वनविभागाच्या मदतीने पानवठा तयार करण्यात आला. या पानवठ्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबवणार आहे.तप्त उन्हामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाण्याअभावी अनेक प्राणी गावामध्ये शिरकाव करीत आहेत. त्यामुळे सार्ड संस्थेनी वन्यप्राण्यांच्या सोईसाठी पानवठा तयार केला. यावेळी बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, सार्डचे अध्यक्ष प्रकाश कामडे, क्षेत्र सहाय्यक पी. आर. वेलमे, नियत वनरक्षक पी. वी. बोबाटे, सार्ड पदाधिकारी भािवक येरगुडे, संजय जावले, विलास माथनकर, मोंटी खंडेलवार, गुरपीतसिंग कलसी आदी उपस्थित होते.सार्ड संस्थेतर्फे जंगल भागातील नाल्यात एका ठिकाणी ओलसर भाग पाहून त्याच ठिकाणी खोदण्यात आले. पानवठा दोन फूट खोल वीस फूट लांब खोदताच त्या ठिकाणी पाणी लागले. सदर पाणी जून महिन्यापर्यंत पुरेल असा अंदाज आहे. पानवठ्यामुळे त्या भागातील लहान मोठे वन्यजीव, पक्षी, सरपणारे प्राणी व जून महिन्यापर्यंत पाण्यासाठी भटकंती बंद होणार आहे. याप्रसंगी संतोष थिपे यांनी संस्थेच्या सभासदांना प्रेरणा दिली. संस्थांनी वनविभागाला मदत केल्यास वन्यजीव व जंगलाच संरक्षण करणे सोपे जाईल असा आशावाद व्यक्त केला.पानवठ्यासाठी सार्ड संस्थेच्या २० सभासदांनी तसेच बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील वनमजुरांनी श्रमदान केले. पानवठा खोदकामासाठी अब्दुल पठान, प्रशांत मैत्र, बादल टेंभुरकर, सचिन ढेंगले, महेंद्र राले, आनंद शर्मा, नितीन डोंगरे, सचिन धोटे यांच्यासह सार्ड संस्थेचे पदाधिकारी व सदस्य आदींनी प्रयत्न केले.
वन्यजीवांसाठी जंगलात पाणवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:19 IST
वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सार्ड’ (सोशल अॅक्शन फॉर रूरल डेव्हलपेंट) या संस्थेच्या वतीने मध्य चांदा वनविभागातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा बिटात संस्थेच्या व वनविभागाच्या मदतीने पानवठा तयार करण्यात आला. या पानवठ्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबवणार आहे.
वन्यजीवांसाठी जंगलात पाणवठा
ठळक मुद्देवन्यप्राण्यांची भटकंती थांबणार : सार्ड संस्थेचा उपक्रम