ग्रामस्थांनी का बंद पाडले ताडोबाचे पर्यटन गेट? गावे वर्षानुवर्षे सोसत राहिली, अखेर आक्रोश जगासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:29 IST2025-10-14T13:27:39+5:302025-10-14T13:29:14+5:30

Chandrapur : बरडघाट, पंढरपौनी, झरी ग्रामस्थांचा वन विभागाविरोधात एल्गार

Why did the villagers close the tourist gate of Tadoba? The villages suffered for years, finally the outcry was expressed to the world | ग्रामस्थांनी का बंद पाडले ताडोबाचे पर्यटन गेट? गावे वर्षानुवर्षे सोसत राहिली, अखेर आक्रोश जगासमोर

Why did the villagers close the tourist gate of Tadoba? The villages suffered for years, finally the outcry was expressed to the world

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर (चंद्रपूर) :
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेली बरडघाट, पंढरपौनी आणि झरी ही गावे नावाने जंगलाच्या वेशीवर असली, तरी मूलभूत सुविधांच्या बाबतीत मात्र अजूनही बफर क्षेत्राच्या बाहेरच राहिली आहेत. वन्यजीवांचा सततचा त्रास, शेतसीमेवरील असुरक्षितता, रोजगाराचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे ग्रामस्थांचा संताप उसळला. याच पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १३) दुपारी शेकडो ग्रामस्थांनी ताडोबा प्रकल्पातील नवेगाव बफर पर्यटन गेट बंद करून तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत गेट उघडणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

ताडोबा प्रकल्पातील पुनर्वसित गावांना मोबदला, रोजगार आणि विकास योजना मिळाल्या असताना, ताडोबाच्या अगदी हाकेवर असलेली बरडघाट, पंढरपौनी व झरी ही गावे मात्र विकासाच्या रेषेबाहेरच राहिली आहेत. बरडघाट, पंढरपौनी व झरी गावांचा बफर क्षेत्रात समावेश करावा, जंगलाभोवती संरक्षणात्मक कुंपण उभारावे, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या, जनावरांना चराईपास मंजुरी द्यावी, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू किंवा जखमी झाल्यास तातडीची नुकसानभरपाई द्यावी, या मागण्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष उतराव्यात, अशी ठाम भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली.

या आंदोलनाचे नेतृत्व बरडघाटचे माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे, यांच्या मार्गदर्शनात हरिभाऊ रिनके, प्रभाकर दोडके, रामभाऊ मेश्राम, विलास पुसनाके, गोकुल उईके, प्रकाश रामटेके, पवन धुर्वे, हरिदास खुरसंगे, गजानन धुर्वे यांनी केले. तिन्ही गावांतील शेकडो महिला व युवक नवेगाव गेटवर उपस्थित राहून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

अनुचित घटना घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दिनेश लबडे यांनी गेट परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. विशेष व्याघ्र संरक्षण दल, प्राथमिक कृती दल, वन कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.

Web Title : ग्रामवासियों ने ताडोबा पर्यटन गेट बंद किया: वर्षों की उपेक्षा का विस्फोट

Web Summary : उपेक्षा से तंग आकर, ताडोबा टाइगर रिजर्व के पास के ग्रामीणों ने बुनियादी सुविधाओं, नौकरियों और वन्यजीव क्षति के मुआवजे की मांग करते हुए नवेगांव पर्यटन गेट को पांच घंटे के लिए बंद कर दिया। वे बफर जोन में शामिल करने और सुरक्षात्मक बाड़ लगाने की मांग करते हैं।

Web Title : Villagers Shut Tadoba Tourism Gate: Years of Neglect Erupt

Web Summary : Fed up with neglect, villagers near Tadoba Tiger Reserve closed the Navegaon tourism gate for five hours, demanding basic amenities, jobs, and compensation for wildlife damage. They seek buffer zone inclusion and protective fencing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.