शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

मिनी विधानसभा निवडणूक कोण जिंकणार ?

By admin | Updated: November 18, 2016 01:10 IST

बल्लारपूर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी राखीव करण्यात आले.

बल्लारपूर नगर परिषद निवडणूक : भाजपाला शिवसेनेची तर काँग्रेसला बंडखोरांची अडचणअनेकश्वर मेश्राम  बल्लारपूरबल्लारपूर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी राखीव करण्यात आले. नगराध्यक्षपदाची निवडणूक यावर्षी थेट मतदारांतून करण्यात येत आहे. यामुळे निवडणुकीला मिनी विधानसभा निवडणुकीचे स्वरुप आले आहे. येथे अध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस, भाजपासह अन्य राजकीय पक्षाच्या उमेदवारासह १४ उमेदवार लढवित आहेत. या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला शिवसेना उमेदवाराची तर काँग्रेसला बंडखोर उमेदवाराची अडचण निर्माण झाली असून मिनी विधानसभा निवडणूक कोण जिंकणार, असा अंदाज मतदारात वर्तविला जात आहे.बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच येथील नगराध्यक्ष पदाची निवड मतदार मतदानाच्या माध्यमातून करणार आहेत. येथील नगरपरिषदेला ‘ब’ वर्गाचा दर्जा असून जिल्ह्यात सर्वात मोठी पालिका म्हणून ओळखली जाते. यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे येथील निवडणुकीवर लक्ष लागले आहे. येथील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व काँग्रेस पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी दोन्ही पक्षासाठी अन्य पक्षाच्या उमेदवारांमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशातच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने हजार व पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्याने उमेदवारांवर खर्चाचे सावट उभे झाले आहे.येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्ष पदाची निवडणूक भाजपाचे उमेदवार हरिश शर्मा, काँग्रेसचे व्यंकटेश एम. बालबरैय्या, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे व बंडखोर उमेदवार नासीर खान, शिवसेनेचे उमेदवार विनोद उर्फ सिक्की यादव, बीआरएसपीचे उमेदवार राजू झोडे, बसपाचे मारोती सोमकुंवर, भारिप बहुजन महासंघाचे उमेश कडू, राष्ट्रवादीचे अल्ताफ हाजी युनुस, शेख अब्दुल, किशोर पुसलवार, सुनील सोनुले, शेख अब्बास युसूफ व भारत थुलकर यांच्यात लढली जात आहे. यासोबतच आरपीआरच्या वंदना चव्हाण एकमेव महिला उमेदवार म्हणून अध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत.यातील भाजपाचे हरिश शर्मा, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नासीर खान, शिवसेनेचे विनोद उर्फ सिक्की यादव, बीआरएसपीचे राजू झोडे हे विद्यमान नगरसेवक असून आताच्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मतदारांना मतासाठी आर्जव करीत आहेत. तर अपक्षातील भारत थुलकर व शेख अब्बास यांनी माजी नगरसेवक पदाचा अनुभव घेत अध्यक्षपदासाठी लढत देत आहेत.यावेळच्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत एका मतदाराला अध्यक्षपदाच्या उमेदवारासह एका प्रभागातून दोन असे एकूण तीन उमेदवारांना एकाच वेळी मतदानाची संधी मिळाली आहे. यामुळे येथील मिनी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. येथील ८४ हजार ५२२ मतदार अध्यक्षासह १६ प्रभागातील ३२ उमेदवारांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करणार आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून हळूहळू प्रचाराला वेग येत आहे. येथील निवडणुकीत नव्याने नोंदणी झालेले १ हजार ९५४ मतदार पहिल्यांदाच नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत, हे विशेष!अध्यक्षपदासाठी मराठी व अमराठी उमेदवारीत संभ्रमबल्लारपूर नगरपरिषद जिल्ह्यात सर्वात मोठी आहे. बल्लारपूर औद्योगिक शहर असल्याने सर्वच जाती, धर्म, पंथाच्या नागरिक येथे गुण्यागोविंदाने वास्तव्याला आहेत. दक्षिण भारताला जोडणाऱ्या शहराची मतदार संख्या ८४ हजार ५२२ असून यात ४३ हजार ६५९ पुरुष व ४० हजार ८६० महिला मतदारांचा समावेश आहे. येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून राजकीय पक्षांचे हिंदी व तेलगू भाषक उमेदवाराला संधी दिल्यामुळे मराठी भाषीक मतदारात काहीशी नाराजी दिसून येत आहे. परिणामी येथील निवडणुकीला प्रांतीय स्वरुप निर्माण झाल्याचे प्रचारातून दिसून येत आहे. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मराठी व अमराठी उमेदवारांसदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.