कारवाईतील ‘तो’ स्फोटकांचा ट्रॅक्टर गेला कुठे ?

By Admin | Updated: February 1, 2016 00:56 IST2016-02-01T00:56:41+5:302016-02-01T00:56:41+5:30

येथून १५ किमी अंतरावर सीमेलगत असलेल्या महाराजगुडा येथे तेलंगणा राज्यातून विहीर खोदकामासाठी स्फोटक ...

Where did 'the explosive' tractor went in action? | कारवाईतील ‘तो’ स्फोटकांचा ट्रॅक्टर गेला कुठे ?

कारवाईतील ‘तो’ स्फोटकांचा ट्रॅक्टर गेला कुठे ?


जिवती : येथून १५ किमी अंतरावर सीमेलगत असलेल्या महाराजगुडा येथे तेलंगणा राज्यातून विहीर खोदकामासाठी स्फोटक साहित्य भरून आलेले ट्रॅक्टर जिवती पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी पकडले. परंतु कारवाई केवळ संबंधित व्यक्तीवर करण्यात आली आणि ट्रॅक्टर सोडण्यात आले. यामुळे सदर कारवाईतील ट्रॅक्टर गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तेलंगणा राज्यातून सध्या जिवती तालुक्यातील काही गावात विहीर खोदकामासाठी स्फोटक साहित्य भरून ट्रॅक्टर आले होते. यामध्ये इलेक्ट्रिक डिटोनेटर, जिलेटीन या स्फोटक वस्तुसोबत बाइंडिंग तार, ब्लास्टिंग बाक्स मशीन हेसुद्धा साहित्य होते. विहीर खोदकाम करीत असताना दगड फोडण्यासाठी या स्फोटक साहित्याचा वापर होतो. मात्र यासाठी ट्रॅक्टर इंजीनचाही वापर केला जातो. ट्रॅक्टर इंजीनला जवळपास ३० ते ४० मीटर लांब पाईप जोडलेला असतो आणि तो पाईप विहिरीत सोडून ज्या ठिकाणी स्फोट घडवायचा आहे, तिथे हवेच्या दाबेने ही क्रिया केली जाते. होस पाईपद्वारे हवेचा दाब देण्यासाठी ट्रॅक्टरचे इंजीन चालू करावे लागते. या सर्व वस्तुंचा परस्परपुरक संबंध असून ट्रॅक्टरवर कारवाई न करता पोलिसांनी ट्रॅक्टर सोडला कसा, असा प्रश्न निर्माण होतो. विहीर खोदकामात स्फोटक साहित्य वापरले जात असले तरी त्यासाठी शासनाचा परवाना असणे आवश्यक असते. परंतु येथे आलेला ट्रॅक्टर व स्फोटक पदार्थाबाबत कोणत्याही प्रकारचा परवाना नव्हता.
सिनु मलेशाम गोलुसुल्ला (२५) रा. ताळीहातनुर ता. उटनुर जि. आदिलाबाद असे ट्रॅक्टरचालकाचे नाव असून त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई केली आहे. मात्र ट्रॅक्टर सोडून देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Where did 'the explosive' tractor went in action?