शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

्रडीपी प्लॅनमधील मार्ग झाले संकुचित

By admin | Updated: November 19, 2015 00:57 IST

शहराचा व्याप आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी शहरासाठी केलेले नियोजन मात्र तोटके पडत आहे.

अतिक्रणाने वेढले १६ मार्गगोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर शहराचा व्याप आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी शहरासाठी केलेले नियोजन मात्र तोटके पडत आहे. महानगर होण्याच्या मार्गावर असलेल्या चंद्रपुरातील वाढती लोकसंख्या, वाढती वाहने आणि दैनंदिन गरजांसाठी असलेली बाजारपेठ लक्षात घेता दळणवळणासाठी असलेले मार्ग अडचणीचे ठरत आहे. प्रत्यक्षात या मार्गांची रुंदी मोठी असली तरी मागील काही वर्षात मार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाढलेली अतिक्रमणे आणि त्यांना आलेले ‘कायम’पणाचे स्वरूपच अडचणीचे ठरत आहे.पराकोटाच्या आत असलेल्या शहरातील नागरिकांच्या वहिवाटीसाठी महात्मा गांधी मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्ग हे दोन प्रमुख मार्ग असले तरी अनेक उपमार्गही तेवढेच महत्वाचे आहेत. या मार्गांच्या टाऊन प्लॅनिंगमध्ये नोंदी असल्या तरी प्रत्यक्षात मात्र या मार्गांकडे कुणीच गांभीर्याने लक्ष न दिल्याने अनेक मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून संकुचित झाले आहेत. असे एक नव्हे तर, १६ मार्ग महानगर पालिकेने आपल्या हिटलिस्टवर आणल्याने भविष्यात या मार्गांवरील अतिक्रमणे हटविणे गरजेचे झाले आहे.प्रशासनाच्या अलिकडेच झालेल्या एका बैठकीत शहरातील या मार्गांवर वाढलेल्या अतिक्रमणाबद्दल गंभीर चर्चा करण्यात आली. शहरातील मार्ग डीपीच्या (विकास आराखडा) नकाशावर मोठे दिसत असले तरी आता ते मोठे राहिलेले नाहीत. यामुळे अस्तीत्वात असलेल्या मार्गांवरील अतिक्रमण दूर केले तर वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी दूर होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी भविष्यात ठोस उपाययोजना करण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी ही मुख्य समस्या आहे. ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. गेटला पाच मार्ग मिळत असल्याने या मार्गांवरील भार हलका करण्यासाठी उपाययोजना शोधल्या जात आहेत. यासाठी मनपाने अधोरेखित केलेल्या १६ मार्गांवरील अतिक्रमण हटविण्याच्या दृष्टीने भविष्यात हालचाली करणे प्रशासनाला क्रमप्राप्त झाले आहे.