शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण टाकीतून चिमूरला केला जातो पाणी पुरवठा

By admin | Updated: February 26, 2015 00:44 IST

चिमूर येथील शहीद स्मारकाजवळ ४२ वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बांधली. आता ही टाकी जीर्ण झाली असून केव्हा पडण्याच्या स्थितीत आहे. असे असले तरी याच टाकीतून चिमूरवासियांना पाणी पुरवठा केला जात आहे.

चिमूर : चिमूर येथील शहीद स्मारकाजवळ ४२ वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बांधली. आता ही टाकी जीर्ण झाली असून केव्हा पडण्याच्या स्थितीत आहे. असे असले तरी याच टाकीतून चिमूरवासियांना पाणी पुरवठा केला जात आहे. या पाण्याच्या टाकीला लागून जिल्हा परिषदेची शाळाही आहे. त्यामुळे एखाद्यावेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.चिमूर येथे १९७२ मध्ये साडेतीन लाख लिटरची पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्यावेळची लोकसंख्या लक्षात घेता ही टाकी बांधण्यात आली. या टाकीतून नेहरू वार्ड, आझाद वार्ड, गांधी चौक व गुरुदेव वॉर्डात पाणी पुरवठा केला जातो. टाकी फार जुनी असल्याने टाकी संदर्भात पाणी पुरवठा विभाग व ग्रामपंचायत चिमूर यांच्या वतीने डॉ. एस.एस. कुलकर्णी यांना पत्र देऊन या टाकीचे निरीक्षण करण्यात आले होते. त्यांनी २३ आॅक्टोबर २००८ मध्ये ग्रामपंचायत व पाणी पुरवठा विभागाला पत्र पाठवून ही टाकी जीर्ण झाली असून केव्हाही पडण्याची शक्यता त्यांच्या अहवालातून वर्तविली होती. त्यानुसार चिमूर ग्रामपंचायतीने या संदर्भात ठराव घेऊन सदर पाण्याची टाकी पाडण्यात यावी, असे पत्रही संबंधित विभागाला दिले होते. परंतु यावर अजूनपर्यंत कोणतेही कार्यवाही होऊ शकली नाही. पाण्याची टाकी जीर्ण झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे कर्मचारीही ही टाकी अर्धीच भरतात. त्यामुळे लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या चार वॉर्डात करण्यात येणारा पाणी पुरवठा अत्यल्प असतो. परिणामी येथील नागरिकांची पाण्यासाठी ओरड होते. उल्लेखनीय असे की या पाण्याच्या टाकीजवळच जिल्हा परिषदेचे पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जीर्ण पाण्याच्या टाकीमुळे या शाळेलाही धोका निर्माण झाला आहे. पाण्याची टाकी शाळेवर किंवा विद्यार्थ्यांच्या अंगावर पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीने वारंवार ठराव घेऊन व संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून पाण्याची टाकी पाडण्यास बजाविले आहे. मात्र संबंधित विभागाकडून कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. (शहर प्रतिनिधी)