शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईचा कृती आराखडा कागदावरच

By admin | Updated: June 3, 2014 23:58 IST

कोरपना तालुक्यातील ५४ ग्राम पंचायती अंतर्गत येणार्‍या ११३ गावांपैकी सुमारे ५0 पेक्षा अधिक गावांत पाणी टंचाईची भीषण परिस्थिती बघता पंचायत समिती स्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला.

अशोककुमार भगत - कोरपनाकोरपना तालुक्यातील ५४ ग्राम पंचायती अंतर्गत येणार्‍या ११३ गावांपैकी सुमारे ५0 पेक्षा अधिक गावांत पाणी टंचाईची भीषण परिस्थिती बघता पंचायत समिती स्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला. या गावांसाठी उपाययोजना कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्या असल्या, तरी ही कामे प्रत्यक्षात केव्हा सुरू होतील, असा प्रश्न त्रस्त नागरिकांना पडला आहे. दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असतानाही टंचाईग्रस्त गावातील पाणी योजनांची अंमलबजावणी झाली नसल्याने येथील पं.स. च्या कृती आराखड्यावरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे. सध्या तालुक्यातील विरुर (गाडे), पारडी, गाडेगाव, उपरवाही, गडचांदूर, लखमापूर, नारंडा, पिपरी, धानोली, खैरगाव, पांडवगुडा, इरई, बोरगाव, खैरगाव, अंतरगाव, सांगोडा, परसोडा, बाखर्डी, कवठाळा, भोयगाव, भारोसासह सुमारे ५0 पेक्षा अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विहिरी आणि कुपनलिकांनी तळ गाठल्यामुळे तेथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. उन्हाच्या तीव्र झळा आणि नदी, नाले, तलाव कोरडे पडू लागल्याने पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. तालुक्यात अंमलनाला व पकडीगुड्डम हे दोन जलाशय असून नारंडा आणि नांदगाव (सूर्य) येथे गावतलाव आहेत. तेथील जलस्तर खालावला आहे. तालुक्याच्या सिमेवरुन वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्या प्रवाहीत होत असल्या तरी नदी काठावरील सुमारे १६ गावे तहानलेलीच आहेत. पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात पाणी टंचाई अशा दुहेरी कात्रीत ही गावे अडकली आहेत.सुमारे ३५ हजार लोकवस्तीच्या गडचांदूर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या सदोष वितरण पद्धतीमुळे रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक वॉर्डात नळांना पाणी येत नसल्यामुळे हातपंपावर रांगा लावून पाणी भरण्याची कसरत करावी लागत आहे. नाल्याच्या जुन्या विहिरीतील पाणी जलकुंभात साठवल्यानंतर त्याचे वितरण जलवाहिन्यांच्या माध्यमातून गावात केले जाते. ३0 वर्षे जुन्या असलेल्या  या जलवाहिन्या जिर्ण झाल्याने पाणी गळती वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे गडचांदूरसाठी ११ कोटी ७६ लाखांची नळयोजना मंजूर करण्यात आली. दोन वर्षाचा कालावधी लोटूनही हे काम अपूर्णच आहे. वार्ड क्रमांक एकमध्ये जलशुद्धीकरण संयत्र उभारले असून जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. या वॉर्डातील भीषण पाणी टंचाई बघता २६ एप्रिलपासून नजीकच्या गोपालपूर येथील खासगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले. गडचांदुरात तब्बल १८२ शासकीय हातपंप असून यांपैकी ५0 च्या वर पंपानी उन्हाळ्यापूर्वीच ‘हात’ टेकले. त्याची अद्यापही दुरुस्ती झाली नाही.टंचाईग्रस्त भागातील पाणी योजना राबविण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही पंचायत समितीद्वारा कृती आराखडा तयार करण्यात आला. त्या अनुषंगाने विरुर (गाडे), भोयगाव, कातलाबोडी, खैरगाव, कुकूडबोडी, धानोली, निमनी येथील नळयोजनांच्या दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली. ही कामे कासवगतीने सुरू आहेत. पारडी, उपरवाही, धानोली तांडा, गाडेगाव, पांडवगुडा येथील हातपंपाची कामे प्रस्तावित असली तरी या कामांना अद्यापही सुरुवातच झाली नाही. या पार्श्‍वभूमीवर तालुका प्रशासन पाणी टंचाई व त्यावर केलेल्या नियोजनाचे केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात भीषण टंचाईच्या झळा मात्र जनसामान्यांना सोसाव्या लागत आहे.