शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील पाणी पेटणार

By admin | Updated: May 14, 2017 00:31 IST

मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. अशा काळात कंत्राटदार कंपनीच्या मनमानीमुळे मनपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनेक वॉर्डात टंचाई : सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी दंड थोपटलेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. अशा काळात कंत्राटदार कंपनीच्या मनमानीमुळे मनपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनपातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून प्रशासनाविरोधात दंड थोटपले आहे. अयोध्या नगर, हनुमान नगर, सुमित्रनगर, दत्त नगर, आदी विविध भागांत गेल्या पाच वर्षांपासून व्यवस्थित पाणी पोहोचत नाही. वडगाव, डॉ. आंबेडकर नगर, बाबुपेठ आदी भागातही पाण्याचा प्रश्न आहे. मनपाच्या नवीन पदाधिकाऱ्यांपुढे पाण्याचा पेच निर्माण झाला आहे. तीन आठवड्यानंतर मान्सून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच चंद्रपूर शहरात शनिवारी मान्सूनपूर्व धारा बरसल्या आहेत. उन्हाळा संपायला आला तरी पाणी समस्या कायम आहे. गेल्या मार्च महिन्यात सुमित्र नगर, हनुमान नगर, अयोध्या नगर येथील नागरिकांनी नळाचे पाणी मिळत नसल्याची तक्रार केली होती. गेल्या पाच वर्षांपासून पाणीपट्टी भरतो, तरी पाणी का मिळत नाही, असा टाहो नागरिकांनी फोडला होता. तसेच एकोरी वॉर्ड, भिवापूर, बाबुपेठ, डॉ. आंबेडकर नगर, इंडस्ट्रियल वॉर्ड, वडगाव आदी परिसरातही नियमित पाणीपुरवठा होत नाही.आता या प्रश्नाने उग्ररूप धारण केले आहेत. शहराच्या सर्वच भागात समान पातळीवर पाणीपुरवठा केला जात नाही. त्याबाबत २०१३पासून तक्रारी करण्यात येत आहेत. चंद्रपूर शहराला मनपाने पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शनकडे आहे. या कंपनीच्या विरोधात सुमित्र नगर, महेश नगर येथील नागरिकांनी तक्रार केली.सत्ताधारी नगरसेवक करणार उपोषणनगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी दे. गो. तुकूम प्रभागात येणाऱ्या विविध भागातील नागरिकांना नळाचे पाणी मिळत नसल्याचे पत्र मनपाचे आयुक्त संजय काकडे यांना दिले. त्यावर शहर अभियंता महेश बारई यांनी ८ मे रोजी उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला तक्रारीचे निराकरण करण्याचे आदेश दिले. पत्र प्राप्त होताच या भागांमधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. परंतु अद्याप पाणी समस्या आहे. त्यामुळे नगरसेवक कासनगोट्टूवार यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.पाणी प्रश्नावर बसपा व शहर आघाडी आक्रमकशहराच्या अनेक भागात अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगून बसपा व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी मनपाची विशेष सभा आयोजित करण्याची मागणी महापौर अंजली घोटेकर यांच्याकडे केली आहे. वडगावसह विविव वॉर्डांमध्ये पाणी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जटपुरा गेट प्रभागातील जलनगर वॉर्डात सुहाना शेख या दीड वर्षीय मुलीचा नालीत पडून मृत्यू झाला. बसपाचे गटनेते अनिल रामटेके, पितांबर कश्यप, बंटी परचाके आणि शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख आदींनी महापौरांची भेट घेऊन मागणी केली आहे.