शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणींनी घटतेय पाण्याची पातळी

By admin | Updated: June 8, 2015 01:54 IST

राजुरा तालुक्याला कोळसा खाणींचे वरदान असले तरी कोळसा उत्खननासाठी वेकोलित मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या प्रचंड उपशामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

प्रकाश काळे  गोवरीराजुरा तालुक्याला कोळसा खाणींचे वरदान असले तरी कोळसा उत्खननासाठी वेकोलित मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या प्रचंड उपशामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. परिणामी भविष्यात वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे राजुरा तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट घोंगावत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणी बोअरवेलपेक्षा २०० ते ३०० फुट अधिक खोल असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. तालुक्यात गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणी विस्तारल्या आहेत. वेकोलिने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह बदलल्याने थोड्याफार पावसाने वेकोलि परिसरातील गावात पूर परिस्थिती निर्माण होते. वेकोलिची गोवरी नं. १ कोळसा खाण गोवरी गावाला अगदी लागून आहे. वेकोलिने गोवरी गावालागत असलेल्या नैसर्गिक नाल्यावर मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहेत. मात्र ते टाकताना दुष्परिणामांचा विचार वेकोलि प्रशासनाने केला नाही. वेकोलि परिसरातील नाले, नदी, उन्हाळ्यापूर्वीच आटत असल्याने जनावरांना पाणी मिळणे कठीण होते. शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. परंतु वेकोलिच्या कोळसा खाणी खासगी बोअरवेल पेक्षाही अधिक खोल असल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.कोळसा खाणीतील पाण्याच्या प्रचंड उपसामुळे दिवसेंदिवस राजुरा तालुक्यातील गावांत पाणी टंचाई उग्ररूप धारण करीत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी दिवसरात्रं भटकंती करावी लागते. मात्र वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे होणाऱ्या या दुष्परीणामांचे भोग परिसरातील जनतेला भोगावे लागतात. परंतु अनेकदा गावकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी वेकोलि प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मात्र वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. कोळसा खाणीतून उडणाऱ्या धुळीने शेतातील पीक पूर्णत: काळवंडते. वेकोलि परिसरातील रस्ते धुळीने माखले असून त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार बळावण्याची भीती असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र वेकोलि प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने कोळसा खाणींचे दुष्परिणाम जनतेला भोगावे लागत आहे. मात्र यावर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत.