शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा

By admin | Updated: December 13, 2014 22:37 IST

मागील वर्षीच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कोरपना तालुक्यातील नदी-नाल्या शेजारील शेकडो हेक्टर पिकांची अतोनात हानी झाली. शासनस्तरावर त्याची दखल घेऊन सर्व्हे करण्यात आला.

चंद्रपूर : मागील वर्षीच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कोरपना तालुक्यातील नदी-नाल्या शेजारील शेकडो हेक्टर पिकांची अतोनात हानी झाली. शासनस्तरावर त्याची दखल घेऊन सर्व्हे करण्यात आला. नंतर पूरपीडितांना मदतही जाहीर करण्यात आली. तथापि, तालुक्यातील सोनुर्ली (गाडेगाव) येथील तब्बल ९३ शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित राहिल्याची बाब उजेडात आली आहे.
तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने गेल्या वर्षी पूरपीडितांचा सर्व्हे केला होता. यामध्ये सोनुर्ली (गाडेगाव) येथील ९३ शेतकऱ्यांच्या जमिनी पुराने खरडून गेल्या. त्यावरील उभी पिके वाहून गेली. तालुक्यातील इतर शेतकऱ्यांप्रमाणे आपणासही शासनाची मदत मिळेल, अशी आशा बाळगून होते. मात्र, अन्य गावातील शेतकऱ्यांना मदत मिळाली, तर सोनुर्लीवासीयांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली.
यासंदर्भात श्यामराव बांदूरकर, नारायण डायकी आणि अन्य शेतकऱ्यांनी कोरपना येथील तहसीलदारांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. तेव्हा दोन आठवड्यात ही मदत देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र मदत मिळालीच नाही.
दरम्यान, १ आॅक्टोबरला येथील शेतकऱ्यांनी चंद्रपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन अन्याय दूर करण्याची मागणी केली. त्याच दिवशी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर आणि अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदने दिली. या निवेदनाची दखल घेऊन ना.अहीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या गंभीर बाबीची तातडीने सोडवणूक करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यावरून आता दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आता कुणाकडे धाव घ्यायची असा प्रश्न येथील आर्थिक संकटात सापडलेल्या त्रस्त शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)