शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील होमगार्ड वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:46 IST

पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुवस्था सांभाळणाऱ्या होमगार्ड प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र होमगार्ड अद्यापही वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळताना पोलिसांच्या मदतीला जाण्यासाठी होमगार्ड सदैव तत्पर असतात.

ठळक मुद्देअपुरे मानधन : आचारसंहितेपूर्वी आदेश काढूनही अंमलबजावणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुवस्था सांभाळणाऱ्या होमगार्ड प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र होमगार्ड अद्यापही वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.कायदा व सुव्यवस्था सांभाळताना पोलिसांच्या मदतीला जाण्यासाठी होमगार्ड सदैव तत्पर असतात. पोलिसांएवढीच महत्वाची जबाबदार ते बजावतात. मात्र, होमगार्ड जवानांना आजही दुय्यम स्थान दिले जाते. विशेषत: वर्षभरात विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांसोबतच होमगार्डची नियुक्ती केली जाते. त्यासाठी प्रति दिवसाचे ४०० रूपये मानधन दिले जाते. महागाईच्या काळात तटपुंजे मानधन मिळत असल्याने विविध समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यामुळेच दिवसाला ७५० रूपये मानधन मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.नियमाप्रमाणे होमगार्डला वर्षभरात १८० दिवस काम देण्यात येईल. असे ठरले आहे. मात्र, उर्वरित दिवसात काम उपलब्ध न झाल्यास प्रपंच चालवावाया, तर कसा असा प्रश्न निर्माण होतो. होमागार्ड जवानांनी आम्हाला ३६५ दिवस कामावर ठेवण्याची मागणी केली आहे. ही मागणी अद्यापही शासन दरबारी पणर््ूा झालेली नाही. अत्यल्प मानधनात किती दिवस काम करावे, असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.दुसरीकडे कामावरून कमी करण्यात आलेल्या जवानांनी अनेकदा आंदोलनेही केलीत. आंदोलनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करीत राज्य शासनाने ८ मार्च २०१९ ला शासन निर्णय काढला. यात शारीरिक पात्रतेच्या कठोर असलेल्या अटी शिथील करण्यात आल्या. तसेच वर्यामर्यादा ५५ वर्षावरून ५८ वर्ष करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. मात्र, यासंदर्भात विभागीय महासमादेशकांनी सदर शासन निर्णयावर प्रपत्र काढले नसल्याची माहिती आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चला लागू झाली. तत्पूर्वीच राज्यशासनाने शासनादेश काढला. मात्र,घोडे कुठे अडले कुणास ठाऊक. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विभागीय महासमादेशकांनीही प्रपत्र का काढले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. परिणामी होमगार्ड अद्यापही वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.अंमलबजावणी करामानधन वाढीचा आदेश काढून अद्यापही त्याची अमंलबजावणी झाली नाही. त्यामुळे होमगार्डची निराशा झाली आहे. परिणामी आर्थिक समस्या त्यांना उद्भवत आहे. त्यामुळे मानधन वाढ त्वरीत करावी.