शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजारावर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 28, 2015 01:19 IST

२०१३ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. मात्र काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही.

चिमूर : २०१३ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. मात्र काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. आज ना उद्या मदत मिळेल या आशेवर चिमूर तालुक्यातील शेतकरी जगत आहे. मात्र त्यांना केवळ आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. यावर्षी दुष्काळीस्थिती आहे, अशावेळी शेतकऱ्यांना जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. आतातरी शासनाने मदत द्यावी, अशी मागणी आहे.चिमूर तालुक्यात २०१३ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील २७ हजार २४३ शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देण्यासाठी मदत जाहीर केली. मात्र यातील ३ हजार २७८ लाभार्थ्यांना अद्यापही नकसान भरपाई मिळाली नाही. विशेष म्हणजे, २३ हजार हजार शेतकऱ्यांना १३ कोटी साठ लाख रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आले. मग उर्वरित शेतकऱ्यांवर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कर्ज घेऊन हंगाम केला. मात्र यावर्षीही निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्यात आहे. यावर्षी उत्पन्न कमी झाले त्यातच भावही कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पुढील हंगामासाठी बँक, सोसायट्या कर्ज देणार नसल्याने शेती करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. जुलै २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये चिमूर तालुक्यातील २३ हजार २४३ तर आॅगस्ट २०१३ मधील पुरामुळे ४ हजार ५१४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. शासनाकडून आलेल्या आर्थिक मदतीत आॅगस्ट २०१३ चे अनुदान वाटप सुरु आहे. काही जुलै महिन्यांतील वाटप करीत उर्वरित रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली. परंतु याच महिन्यातील ३ हजार २७८ लाभार्थी अनुदानाची वाट बघत आहे. आॅगस्ट महिन्यात ४ हजार ५१४ लाभार्थ्यांपैकी १ कोटी ६७ लाख ७८ हजार ६७५ रुपये अनुदान ३ हजार ९७५ लाभार्थ्यांना देण्यात आले. तर उर्वरित लाभार्थ्यांना वाटप सुरु असल्याचे केवळ सांगितल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)विहिरींचा बांधकाम निधी बेपत्ताचिमूर तालुक्यातील मालेवाडा येथील शेतकरी काशिनाथ गजभिये यांना शासनाकडून सिंचन विहिर मंजूर झाली. विहिरीचे बांधकाम सुद्धा सुरु करण्यात आले. परंतु मागील दहा महिन्यांपासून निधी मिळाला नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहे. निधी उपलब्ध करून न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.पीक विमा मिळालाच नाहीसन २०१४-१५ या वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला मात्र शेतकऱ्यांना पिक विमा मिळालाच नसल्याचा आरोप होत आहे. नागभीड तालुक्यातील शेतकरी ईश्वर अमृतकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी संबंधितांना निवेदन देऊन पिक विमा देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, पिक विम्याचा पहिला हप्ता २६ जानेवारीच्या आत देण्याचे शासनाचे आदेश आहे. तर दुसरा हप्ता १० मार्चपूर्वी देणे बंधनकारक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्यापही पिक विमान मिळालाच नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.