साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींची आज निवडणूक होणार असून यातून ४ हजार १९१ गावकारभाऱ्यांना निवडून द्यायचे आहे. यासाठी ११ हजार ३६४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची प्रकिया पूर्ण केली असून तब्बल ११ हजार ३१० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर पोलीस प्रशासनाने २ हजारांवर पोलीस अधिकारी, कर्मचारी, ८०० होमगार्ड तसेच इतर तुकड्याही तैनात केल्या आहेत.
कोरोनाचे संकट असल्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे असून प्रशासनाच्या वतीने प्रत्येक केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. गुरुवारी सकाळपासून प्रत्येक तहसील केंद्रातून पोलिंग बुथ रवाना करण्यात आले आहेत. यासाठी तहसील कार्यालयात सकाळपासून कर्मचारी, अधिकाऱ्यांची लगबग बघायला मिळाली.
निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर केली होती. यामध्ये २२ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर घुग्घुस ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आल्यामुळे येथील निवडणूक रद्द झाली आहे. दरम्यान, चिमूर तालुक्यातील भीती येथील नागरिकांनी नगरपंचायतीच्या मागणीसाठी सर्वच्या सर्व ६५ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. तसेच याच तालुक्यातील कन्हाळगाव येथे केवळ २ उमेदवारी अर्ज आल्यामुळे येथीलही निवडणूक रद्द झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता निवडणूक रिंगणामध्ये ६०४ ग्रामपंचायती असून १८ जानेवारी रोजी तालुकास्तरावर मतमोजणी होणार आहे.
----
२८८५
पोलिसांचा ताफा
---
बिनविरोध गावे
कोरपना तालुक्यातील शिरजखुर्द, गोंडपिपरीतील चेक बेरडी, मूलमध्ये राजगड, उथळपेठ, ब्रह्मपुरीमध्ये किन्ही, बोडधा, सिंदेवाहीत सामदा खुर्द, सावलीमध्ये खेळी, चिमूरमधील हिवरा, मसली, जवराबोडी,
नागभीडमध्ये मेंढा, मांगरुढ, वरोरातील आनंदवन, बोरगाव मो., गुंजाळा, खेमजई, येवती, भद्रावतीतील पानवडाळा, कोकोवाडा, कचराळा, विसापूर रै,
--
संवेदनशील गावे
---
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घ्या
कोरोनाचे संकट अजूनही गेलेले नाही. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, मतदान केंद्रावर सॅनिटायझर तसेच सुरक्षेचे सर्व साधने ठेवण्यात येणार आहे. मात्र, मतदारांनीही आपली जबाबदारी म्हणून विशिष्ट अंतर ठेवून मतदान करणे गरजेचे आहे.
---
पोलीस बंदोबस्त
निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाने २ हजार पोलीस कर्मचारी, अधिकारी, ८०० होमगार्ड, एसआरपीएफची एक तुकडी, सी-६० चे जवान तसेच बाह्य जिल्ह्यातील ८५ पोलीस सज्ज ठेवले आहे.
ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत नेण्यापासून तर दुसऱ्या दिवशी मतदान होतपर्यंत लक्ष ठेवून राहणार आहे. दरम्यान, प्रत्येक केंद्रावरही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
---
तालुकानिहाय ग्रामपंचायती
चंद्रपूर - ३७
बल्लारपूर -१०
भद्रावती- ५३
वरोरा -७८
कोरपना-१६
राजुरा-२८
जिवती-०१
गोंडपिपरी-४३
पोंभूर्णा- २७
सावली- ५०
सिंदेवाही- ४५
मूल - ३७
ब्रह्मपुरी- ६८
नागभीड- ४१
चिमूर- ८०
-----
अशी आहे निवडणूक
ग्रामपंचायत संख्या - ६०४
एकूण प्रभाग- ४१९१
रिंगणातील उमेदवार ११,३६४
महिला उमेदवार-
एकूण मतदान केंद्र -
अधिकारी, कर्मचारी संख्या- ११,३१९
--
बाॅक्स
१८ ला निकाल
१५ जानेवारी मतदान झाल्यानंतर प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठीची तयारी करण्यात आली आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने प्रत्येक तालुकास्तरावर तसे नियोजन केले आहे.
----
कोट
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. गुरुवारी सकाळपासून पोलिंग बुथलाही गावागावांत रवाना करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजवावा.
- संपत खलाटे
जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर.
-----