शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विठोबाने घेतला गाडगेबाबांचा वसा

By admin | Updated: February 23, 2015 01:20 IST

शासन विविध योजनेच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र या योजना कागदावरच दिसत आहेत.

अमोद गौरकार चिमूरशासन विविध योजनेच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र या योजना कागदावरच दिसत आहेत. मात्र गाडगेबाबाचा वसा घेऊन प्रत्यक्ष कृती करीत ग्राम स्वच्छतेचे धडे जनतेला पटवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कवडसी (देश) येथील विठोबा हरी वैद्य करीत आहेत.शंकरपूरपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले कवडसी (देश) हे एक हजार लोकवस्तीचे गाव. याच गावातील रहिवासी असलेले विठोबा वैद्य. आज त्याचे वय ५५ वर्ष आहे. या वयातही गावोगावी फिरुन प्रत्यक्ष कृतीतून ते ग्रामस्वच्छतेचे धडे लोकांना देत आहेत. गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांचा वसा चालविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. दररोज पूर्ण गाव स्वच्छ करणे, गावातील सर्व रस्त्यावर पहाटे पाणी शिंपणे, विठ्ठल मंंदिरात पूजा करणे व सायंकाळी भजन व कीर्तन करणे हा त्याच नित्यक्रम आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे दुर्गंधी पसरली होती आणि त्यातून रोगराई पसरत होती. ते आपणाला राष्ट्रसंतांच्या भजनातून, गाडगेबाबांच्या कीर्तनातून समजले आणि म्हणूनच प्रथम आपला गाव स्वच्छ करण्याचा निर्धार केला व त्यातूनच गावाची स्वच्छता केली. या कृतीची दखल घेऊन गावकऱ्यांनी आपल्याला पूजारी पद दिले, असे त्यांनी सांगितले. आज ते कवडसी व इतर परिसरातील गावात ग्रामस्वच्छता करीत आहेत. विठोबा हे सायलकने प्रवास करीत असून त्यांच्या सायकलच्या मागे नेहमीच खराटा बांधलेला असतो. जिथे घाणीचे साम्राज्य दिसेल, तिथे ते खराट्याने झाडून स्वच्छ करतात. त्याच गावात भजन व कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेवर मार्गदर्शन लोकांना करतात. आपल्या संसाराला तिलांजली देऊन ग्राम स्वच्छतेसाठी त्यांची गावोगावी भटकंती सुरूच असते. कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करता जे मिळेल ते खाऊन ते आपली उपजिवीका चालवित आहेत. असा आधुनिक विठोबा मात्र शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आहे. आतातरी शासनाने या विठोबाला कुटुंब चालविण्याइतपत मानधन द्यावे, अशी अपेक्षा आहे.