शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून चेहरा बदललेल्या कोटगावला सीओंची भेट

By admin | Updated: April 25, 2015 01:32 IST

नागभीड तालुक्यातील कोटगाव येथील गावकऱ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलवून टाकला व प्रशासनाचे लक्ष वेधले.

चंद्रपूर: नागभीड तालुक्यातील कोटगाव येथील गावकऱ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलवून टाकला व प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांनी कोटगावला प्रत्यक्ष भेट देऊन गावकऱ्यांची प्रशंसा केली.तहसीलदार श्रीराम मुंधडा, संवर्ग विकास अधिकारी बीरमवार, कृषी अधिकारी पठाण, माजी जि.प. उपाध्यक्ष अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, माजी जि.प. सदस्य विलास दोनोड, सभापती रेखा जगनाडे, सरपंच अरुण काटेखाये व तालुक्यातील प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्या सर्वांनी गावाची पहाणी करुन एकूण स्थितीचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले. स्व. केशवराव भेंडारकरांनी १५ वर्षांपर्यंत कोटगावचे सरपंचपद सांभाळले आणि १९५६ ला आदर्श गाव म्हणून तत्कालीन शासनाने या गावाला गौरविले होते. नव्हे, विशेष बक्षिस देऊन गावात विविध सोयी- सुविधा प्राप्त करुन दिल्या होत्या. १२ जानेवारीला संपूर्ण गावकऱ्यांनी खराटा हाती घेऊन गाव स्वच्छ केले. गावातील नाल्या उपसून त्यामधून ५० ट्रॅक्टर अस्वच्छ माती बाहेर काढून योग्य विल्हेवाट लावली. गावातील मुख्य रस्यावर मुरुम पसरवून रस्ते निटनेटके व योग्य केले. गावातील अतिक्रमणे हटविली, घनकचऱ्यांचे योग्य व्यवस्थापन केले. शौचालयाचा वापर करण्याचा निर्धार करण्यात आला.गाव व्यसनमुक्त करण्याचा सर्वांनी निर्धार केला. सेंद्रीय खतांचा वापर करुन शेती पिकविण्याचे निश्चित करण्यात आले. हे सर्व कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने गावात मोहल्ला समित्याची स्थापना करण्यात आली. त्यामुळे गावात आज सर्वत्र शांतता व स्वच्छता दृष्टीस पडते. गावाचा चेहरा -मोहरा बदलल्याचे दिसून येते.जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांनी कोटगावला भेट देऊन गावाची पाहणी केली आणि गावाला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निश्चित केले. यावरुन ‘गाव करी ते राव न करी’ याचा प्रत्यय कोटगावच्या उदाहरणावरुन होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)