शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

लॉकडाऊन लागू झाल्यापासून प्रशासन सक्रिय आहे. शहरात संचारबंदी ठेवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. गर्दी होत असेल तर त्यावर तोडगा काढण्यासाठी मनपा, पोलीस प्रशासन नेहमी प्रयत्नशील दिसत आहे. दरम्यान, प्रशासनाने नाकेबंदी करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या अनेकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे.

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगचे तीनतेरा, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन सर्वतोपरी दक्षता घेत आहे. सुरक्षतेच्या दृष्टीने चौथ्यांदा लॉकडाऊन करत घरातच थांबावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीदेखील चंद्रपूर शहरात अनेक वाहनधारक नियमांचे उल्लंघन करत फिरताना दिसत आहेत. याबरोबरच शहरात फिजिकल डिस्टन्सिंगचाही प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.लॉकडाऊन लागू झाल्यापासून प्रशासन सक्रिय आहे. शहरात संचारबंदी ठेवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. गर्दी होत असेल तर त्यावर तोडगा काढण्यासाठी मनपा, पोलीस प्रशासन नेहमी प्रयत्नशील दिसत आहे. दरम्यान, प्रशासनाने नाकेबंदी करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या अनेकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. मात्र तरीही अनेक नागरिक प्रशासनाची नजर चुकवून विनाकरण बाहेर फिरताना दिसत आहे.दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. तीन चाकी व चारचाकी वाहनामध्येही आसन क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती बसून फिरताना दिसत आहे. काही नागरिक मास्क न लावता बिनधास्त फिरत आहेत. प्रशासनाची नजर चुकवून आपण मोठा पराक्रम केल्याच्या आविर्भावात मिरवणाºया अशा नागरिकांमुळे कोरोना संसर्गाची भीत नाकारता येत नाही. शहरातील अनेक प्रभागातील बहुतांश युवक केवळ फिरायला ट्रिपल सीट बाहेर पडत आहे. अनेकांनी तोंडावर रूमाल, मास्क लावलेला नसतो. अशांवर पोलिसांकडून कारवाई होत असतानासुद्धा बाहेर निघणाºयांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे.वाहनचालक देतात आजाराची कारणेविनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहरातील गांधी चौक, जटपुरा गेट, इंदिरा गांधी चौक, बंगाली कॅम्प, बाबुपेठ आदी मुख्य चौकात पोलिसांची चमू तैनात आहे. पोलीस वाहनचालकाला थांबवून विचारणा केली असता अनेकजण आजराची कारणे सांगून गोळ्या खरेदीसाठी जात असल्याचे सांगत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस