शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

घोसरी उपक्षेत्रातील गावे धुरमुक्त

By admin | Updated: January 1, 2017 01:15 IST

वनविभागाच्या पुढाकारीने लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात गॅस योजना मंजुर करुन एक वर्षापर्यंत अनुदानातुन रिफीलिंग उपलब्ध करुन दिल्यामुळे

घोसरी : वनविभागाच्या पुढाकारीने लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात गॅस योजना मंजुर करुन एक वर्षापर्यंत अनुदानातुन रिफीलिंग उपलब्ध करुन दिल्यामुळे घोसरी उपक्षेत्रातील दिघोरी, पिपरी देशपांडे, घोसरी, पिपरी दिक्षीत या गावातील महिलांचा सरपणाचा ताण कमी होवुन अवैध वृक्षतोडीला आढा बसला व सामान्य गरीब कुंटूबाना गॅसचे वितरण केल्यामुळे ही गावे धुरमुक्त होत आहेत. अवैध वृक्षतोडीला आळा बसावा व जंगलातील सरपनाचा ताण कमी होवून जंगलाचे संवर्धन करण्याकरिता वनविभागाच्या पुढाकाराने संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. दिघोरीचे अध्यक्ष पुंडलिक वाकुडकर यांनी ‘घर तिथे वृक्ष’ या संकल्पनेतून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करुन गावकऱ्याच्या सहभागातुन झाडांची देखभाल करण्याचा संकल्प केलेला आहे वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून येथील एका समितीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला समितीच्या सदस्याकडून १०० रू प्रति स्वयंखचार्ने श्रमदानातून लोखंडी जाळीचे वितरण करण्यात आले. त्यामुळे झाडांचे संरक्षण करण्यात आले. जंगलातील हिंसक वन्यप्राण्यामुळे मानव, वन्यप्राणी संघषार्चे प्रमाण कमी होण्याच्या दृष्ट्रीने वृक्षतोड होवू नये, म्हणून गावातील २६९ कुंटुबापैकी अनु.जाती जमाती २०२ लाभाथ्यार्ना गॅस कनेक्शन देण्यात आले. तसेच घोसरी वनव्यवस्थापन समितीतर्फे इतर मागासवर्गियांना, अनु. जातीच्या २९ लाभार्थ्यांना, जमाती प्रवगार्तील २४ लाभाथ्यार्ना २५ टक्के अनुदानातून गॅस कनेक्शन देण्यात आले. मात्र येथील काही कुंटंब अजूनही चुलीवरतीच स्वयंपाक करत आहेत. आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेवुन त्यांनासुध्दा कनेक्शन देण्याचे मान्य केलेले आहे. जंगलात सरपन गोळा करताना मानव वन्यप्राणी संघर्ष टाळन्याकरिता सर्व सामान्य कुटुंबाना गॅसचा लाभ रेशन कार्डाच्या आधारावर घेता येणार आहे .तसेच बायोगॅस , शौचालयातून बायोगॅस संच उपलब्ध झाले आहे .ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन शौचालये बांंधकाम प्रगतीपथावर असुन निरोगीमय जिवनाची कास धरुन प्रत्येकानी गॅसचा वापर करुन वृक्ष व जंगलाचे रक्षन करावे असे आवाहन उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी केले आहे. ( वार्ताहर)